May 2024

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास 

बचत गटाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महिलांना स्वतःच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या मग ‘मागच्यायचं ऱ्हाऊदया पुढच्याचं सुधरा’ या उक्ती प्रमाणे त्यांच्या मुलींच्यासाठी काहीतरी करा असा आग्रह त्यांनी धरला. त्यातून मुलींसाठीच्या कामाला सुरुवात झाली. किशोरी विकास हा रचनात्मक उपक्रम स्थानिक शाळांच्या सहकार्याने सुरू केला. ८-९ वीच्या किशोरींसाठी शाळेत जाऊन तास घेणे असे त्यांचे स्वरूप होते. तासिकांमध्ये किशोरींचे […]

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास  Read More »

मागे वळून बघताना १६ – कातकरी

  बचत गटाच्या कामाला सुरुवात झाली त्याला गावातल्या मुख्य गटाने प्रतिसाद दिला हे गेल्या लेखात आपण पाहिले. त्याकामात वंचित गटांसाठीच्या कामाची बरीच भर पडली गेली. गेल्या ८ वर्षा पासून प्रतिभाताईच्या पुढाकाराने वेल्ह्यातालुक्यात आपण कातकरी समाजासाठी काम सुरू केले.  कातकरी समाज हा सामाजिक उतरंडीमध्ये सगळ्यात खाली त्यामुळे ‘विकास’ या  कुटुंबापर्यंत पोहोचलाच नाही. बहुतेक घरातल्या आई-वडील यांनी

मागे वळून बघताना १६ – कातकरी Read More »

मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात..

 स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली ती ग्रामीण महिलेसाठी, बचत गट करण्यापासून! तेव्हा वाटत होते की ही ग्रामीण महिला, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे तिने मुख्य प्रवाहात यायला हवे. पण जसजशी वर्ष जायला लागली, तसतसे लक्षात यायला लागले की या ग्रामीण महिलांमध्येही वेगवेगळे गट आहेत. ग्रामीण समाजातील महिलांमध्ये एकसंधता नाही. त्यामुळे उपक्रम एकच असला तरी

मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात.. Read More »

नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य

दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० नरेंद्र मोदी यांनी रात्री १२ नंतर ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केले. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार फक्त रोखेनेच होत असल्याने या निर्णयाचा ग्रामीण जनजीवनावर चांगलाच परिणाम होणार होता. पंतप्रधानांनी असा निर्णय घेऊन आपल्या कामाची अचानक परीक्षा घेतली आहे असे वाटून निर्णय कळल्या क्षणीच बचत

नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य Read More »

मागे वळून बघताना १४ – आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे…. 

आपण कामाला सुरुवात केली, तेव्हा बचत गट म्हणजे काय हे ग्रामीण महिलेला माहिती नव्हते आणि हिशोब करणे, पैसे मोजणे अशी आर्थिक कामे करायची भीती वाटत होती. आता हळूहळू महिला ही कामे धिटाईने करू लागल्या आहेत. अनेक गावांना आता गटाचे आर्थिक गणित समजले. व्याजदर किती असेल तर गट बंद होताना व्याजाचा किती वाटा मिळतो हेही लक्षात

मागे वळून बघताना १४ – आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे….  Read More »