आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला - भाग १ - आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ

आध्यात्मिक राष्ट्रयोग १ – आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ

श्री. गिरीश बापट

‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ या विषयावर पहिल्यांदा मांडणी २०१९ मध्ये केली. त्यासाठी कारण

  • मा. राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांनी जून २०१८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात केलेले भाषण-मांडणी
    • राष्ट्रवाद आणि देशभक्तीची तुलना – राष्ट्रवाद एकांगी त्यामध्ये आप-पर भाव, त्यापेक्षा घटनानिष्ठ देशभक्ती (Constitutional Patriotism)

https://youtu.be/8SZ0AVHnTGw?si=D26MuU23BspWAN6g – Speech;  https://www.indiatoday.in/india/story/read-here-the-full-text-of-pranab-mukherjee-s-speech-at-rss-event-1254156-2018-06-07 – Text

  • Constitutional Patriotism हा शब्द कुठून आला? दुसऱ्या महायुद्धाचा पश्चिम जर्मनीचा इतिहास फारसा उज्ज्वल नाही. जर्मन तत्त्वज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी ‘Constitutional Patriotism’ ही संकल्पना आणली. घटनेतून अस्मिता जागृत केली.
  • Territorial Nationalism प्रादेशिक राष्ट्रवाद – अभ्यासशिबिर (१९७१)
    • प्रादेशिक राष्ट्रवाद पुरेसा वाटत नाही. पाकिस्तान-बांगलादेशाचे उदाहरण ताजे आहे.
  • राष्ट्रवाद – राष्ट्रभक्ती – राष्ट्रधर्म – राष्ट्रविचार – राष्ट्रकारण – राष्ट्रयोग
    • राष्ट्रवाद – आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच बरोबर
    • राष्ट्रभक्ती – कृती काय ते स्पष्ट होत नाही
    • राष्ट्रधर्म – ज्याच्यामुळे राष्ट्राची धारणा होते, राष्ट्र टिकून राहते, घडते. ज्याच्यामुळे राष्ट्र घडेल असा धर्म [विवेकानंद, गांधीजी]
      • ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तकात म. गांधी यांनी रचनात्मक कार्यक्रम दिलेला आहे. १८ प्रकारची कामे सांगितली आहेत. त्यांचे ३ प्रकारांमध्ये वर्गीकारण केलेले आहे
        • देशातल्या लोकांमध्ये सामाजिक, मानसिक बदल [६]
        • भौतिक आणि व्यवस्थांमधले बदल [६]
        • काही समाजगटांचा विकासाकडे लक्ष – स्त्रिया, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, वनवासी, कुष्ठरोगी [६]
      • राष्ट्रधर्माचे पालन केले तर स्वप्नातील भारत घडेल – धर्मसंस्थापना, समाजसंस्थापना
        • गरीबातील गरीब माणसाला आपल्या मताला किंमत दिली जाते आहे, असं वाटेल असं वातावरण निर्माण करणे
          • उच्च-नीच वर्ग राहणार नाहीत
          • जाती-जमाती गुण्यागोविंदाने राहतील
          • अस्पृश्यता नसेल
          • व्यसनादी गोष्टींना स्थान नसेल
          • स्त्री-पुरुष समान अधिकार
        • गरीबांच्या हितसंबंधांना बाधा न आणता देशी-विदेशी हितसंबंधांचे रक्षण केलं जाईल.
      • राष्ट्रयोग का पाहिजे? याचा आशय स्पष्ट करायला हवा…आमच्या राष्ट्रामध्ये काय झालं पाहिजे? कसं झालं पाहिजे?
        • देश (भूमी) – country
        • राष्ट्र – nation
        • राज्य (शासन) – state
        • राष्ट्र-राज्य संकल्पना (Nation-state)
      • राष्ट्र हा शब्द कधीपासून कसा वापरायला लागलो?
        • राष्ट्र म्हणजे लोक, समाज
        • नामदेवांचा अभंग – राज्याची पापे राजाला भोगावी लागतात
        • जनपदे, सार्वभौम लोकशाही, प्रजासत्ताक
      • गांधीजी, विवेकानंद – सगळ्यांनी मिळून आपलं जीवन बदलायचे आहे म्हणजे सुधारणा होईल. ‘हिंदस्वराज्य’ पुस्तक
        • जी टिकून राहते ती खरी सुधारणा
        • पाश्चात्य राष्ट्रांनी धाडसीपणा आणि कष्टाळूपणा यामुळे प्रगती केली. यातून वाढलेली भौतिक संपत्ती यालाच सुधारणा म्हणायचे आहे का? नंतर व्यसने व असंतोष देखील वाढीला लागला.
        • खरी सुधारणा – ‘उपभोगावर नियंत्रण’ हे जास्त महत्त्वाचे मूल्य. इंद्रियसंयमनाचे महत्त्व समाजात रुजवणे
        • सर्वांनी संयमन ठेवलं तर राज्यसत्तेची आवश्यकता नाही
        • राज्यसत्तेवर धर्माचा अंकुश
      • विवेकानंदांचा राष्ट्रधर्म – समाजकारण – जीवनपद्धती – परिणाम
        • सुधारणा सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाही
        • समाजजीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करावा लागेल
      • ब्रिटिशांना जे चांगलं वाटत
        • मेकाले
          • उपयुक्ततावादी दृष्टिकोन – सुखसोयी
          • बाजारपेठ – मागणीला पुरवठा
        • माणूस कसा घडवायचा आणि राष्ट्र कसं घडवायचं? राजकीय स्वातंत्र्य मिळालं; आर्थिक, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळायचं आहे. समाजजीवनाचे सर्वच पैलू महत्त्वाचे.
        • राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर
          • अरबांच्या आक्रमणाच्या वेळेची संस्कृती समजून घ्यावी लागेल – रजपूत, शीख, मराठे, विजयनगरचे साम्राज्य
          • बाळशास्त्री हरदास यांची पुस्तके ‘पुण्यश्लोक शिवाजी’, ‘५७ ते सुभाष’
          • सावरकरांचे ‘सहा सोनेरी पाने’
        • क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना यश येऊन स्वातंत्र्य मिळाले असते तर काय झाले असते?
          • स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय याचा विचार क्रांतिकारकांपैकी थोड्या जणांनी केला होता – मानवेंद्रनाथ रॉय, भगतसिंग, सावरकर
        • योग म्हणजे जोडलं जाणं. त्यासाठी एकाग्र व्हावं लागतं. उद्दिष्टाशी जोडण्यासाठी उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींशी जोडलं गेलं पाहिजे. राष्ट्रयोग म्हणजे आधी राष्ट्राशी जोडलं जाणं आणि मग परमेश्वराशी जोडलं जाणं.
        • समाजजीवनाची सर्व अंगे  
          • राजकीय – राजकारण
          • आर्थिक – अर्थकारण
          • सामाजिक – समाजकारण
          • नैतिक विचार – नीतिशास्त्र
          • विज्ञान
          • आध्यात्मिकता – आध्यात्म
        • या सगळ्यांचा एकत्र विचार म्हणजे समग्रता. ज्ञान-कर्मयुक्त-भक्तियोग
        • ज्यांना समग्रता पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे?
          • आधुनिक पंथ – सामाजप्रामाण्य वृत्ती-बुद्धी ही सगळ्यांमध्ये वाढवणं, हे राष्ट्रयोगाचे काम
          • व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजविकास
          • विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥
          • भौतिक प्रगती व चित्त समाधानी
          • सनातन – शाश्वत – पुरातन कचरा काढून – आध्यात्म ईशचिंतन आणि उद्योग व तंत्रज्ञानात आधुनिकातील आधुनिक
          • आधुनिकता – यामध्ये स्वीकार का नवनिर्मिती
            • स्वीकारशील स्वदेशी – आधुनिक निर्माते होणं
          • जीवन परिवर्तन – जीवनयोग
        • गांधीजींचा आध्यात्मिक राष्ट्रयोग
          • व्यक्ती – समाजजीवन
            • संयम
            • श्रमनिष्ठा
            • आध्यात्मिक दृष्टी
            • सत्याचा शोध
            • लोकांना तेजस्वी बनविणारी विद्या
          • जीवन परिवर्तन
          • राष्ट्रयोग
            • राष्ट्रनिर्माणयोग – राष्ट्रनिर्मितीमध्ये एकाग्र होणे
            • याच आयुष्यामध्ये पूर्णत्व
            • व्यक्ती आणि समाजजीवनामध्ये पूर्णत्व

प्रश्न

  • एखादा कृतिकार्यक्रम राबवताना त्यामध्ये समाजजीवनाच्या विविध अंगांनी समग्रता कशी आणायची?
  • समाजाची रचना लावत असताना (समाज संस्थापना करत असताना) प्रत्येक व्यक्तीला हे वाटणं की , ‘माझ्या मताला किंमत आहे’, ही संकल्पना पचायला अवघड वाटली. सर्व साधारण अर्थ म्हणून समजायला ठीक आहे, पण समाजाने कोणाच्या मताला किंमत द्यायची याचा विवेक सतत करायलाच लागतो. वर्ग विग्रह याप्रकारे याकडे न पाहता सुध्दा समाज म्हणून व्यक्त होताना त्यातलं कौशल्य, क्षमता, प्रेरणा यातलं स्तरीकरण आणि तरीसुद्धा समानतेची भावना दृढ करणं हे एकूण आध्यत्मिक राष्ट्रयोगात कसं पाहणार हे अजून समजून घ्यायला हवं असं वाटलं.
  • समाज हे कारण आणि त्यातून तयार झालेली शाश्वत मूल्य हा परिणाम, हा प्राधान्यक्रम समजून घ्यायला अवघड वाटला. स्वतःच्या प्रेरणेने दीर्घकाळासाठी काम करत असताना ती प्रेरणा शाश्वत मूल्यांमुळे टिकते असं वाटतं आणि ती मूल्य जोपासली जावीत यासाठी ते काम आहे. त्यानंतरचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणून ती मूल्य याच समाजात जोपासली जावीत यासाठीचा आग्रह येतो असं वाटलं. आधी लोकं/ समाज असं केलं तर समाजाची मागणी आणि समाजाची आदर्श मूल्य यातला संघर्ष कसा सांभाळणार असा प्रश्न पण पडला.
  • “राष्ट्राने निर्माण केलेली शाश्वत मूल्ये” याला नंतर महत्त्व देऊन “राष्ट्र म्हणजे समाज याला प्रथम प्राधान्य” असे का म्हटले असेल? समाजाचे भौतिक रक्षण आणि किमान निर्वाह याला प्रथम महत्त्व इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे समाजाने आजपर्यंत निर्माण केलेल्या उदात्त मूल्यांकडे आवर्जुन लक्ष द्यावेच लागेल. नाहीतर राष्ट्राचा आत्माच हरवून बसेल. किंवा दुसऱ्या शब्दात, “राष्ट्रधर्मात/राष्ट्रयोगात काय करायचे?” याचे उत्तर “भारतीय राष्ट्राचा आत्मा – म्हणजेच आध्यात्मिकता – याचे शिक्षण व्हावे याची व्यवस्था प्राधान्याने करणे”, असे का नाही?
  • राष्ट्रविचार, राष्ट्रकारण राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रधर्म असे पाच शब्द चर्चेत आले. या प्रत्येक शब्दामध्ये आशयाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. पण आपल्याला रूप पालटू देशाचे यासाठी जे तत्त्वज्ञान मांडायचे आहे, तो सर्व आशय या सर्व छटांच्या बेरजेतून येत नाही. त्यामुळे योग हा शब्द आणून कमी पडणारा आशय, या सर्व छटांच्या बेरजेशी जोडला तर एक पूर्ण विचारसरणी किंवा तत्वज्ञान किंवा जीवनयोग आकाराला येईल, असा हा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य परिभाषा आणि प्रभाव टाळण्यासाठी या संभाव्य परिपूर्ण आशयाला योग्य अशी परिभाषा सुद्धा भारतीय वारसा असलेली तयार करण्याचाही प्रयत्न दिसतो. राष्ट्र म्हणजे प्रामुख्याने समाज आणि समाजाच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि नैतिक अशा सर्व पैलूंना जोडणारे समग्र समाजप्रामाण्य या राष्ट्र योगातून वाढवायचे आहे. त्यासाठी त्याला अध्यात्माचा पाया दिला पाहिजे. या दिशेने सर्व मांडणीचा रोख दिसतो. मला भावलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण मानवतेकडे आणि चराचर सृष्टीकडे जाणारा असा हा राष्ट्रयोग असला पाहिजे….या दृष्टीने सद्यस्थितीमध्ये एकविसाव्या शतकात भारतात आणि जागतिक परिस्थितीत जे महत्त्वाचे बदल विविध विचारसरणी, जागतिक नेतृत्व आणि तंत्रज्ञानाचे विस्फोट यामुळे होत आहेत त्याचा या सर्व मांडणीत निश्चितच व्यावहारिक( प्रॅक्टिकल) राष्ट्रयोग या दृष्टीने विचार करावा लागेल. [विवेकसर]