११. उत्तमता आणि दांभिकता

पुण्यातील टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या सुवर्णहोत्सवानिमित्त झालेल्या
उत्तमतेवरील व्याख्यानमालेत डॉ. जयंतराव नारळीकरांनी एक गोष्ट सांगितली होती.

गुरुकुलातील अध्ययन पूर्ण झाल्यावर कौत्स नावाच्या कुमाराने गुरूंना ‘गुरुदक्षिणा काय देऊ?‌’ म्हणून विचारले. गुरूंनी ‌‘तुला द्यावेसे वाटेल ते दे !‌’ असे सांगितले; पण कौत्स ‌‘तुम्हीच सांगा‌’ म्हणून हट्ट धरून बसला. गुरूंनी मग त्याला चौदा कोटी सुवर्णुद्रा आणून द्यायला सांगितल्या. कौत्स लगेच रघुराजाकडे गेला. रघुराजाकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी त्याने चौदा कोटी सुवर्णुद्रा मागितल्या. रघुराजाने सर्व संपत्ती नुकतीच एका यज्ञात दान देऊन टाकली होती. याचकाला विन्मुख पाठवायचे नाही म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करायचे ठरवले. कुबेराला हे कळताच त्याने आक्रमण करण्याचे कारण विचारले. कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी रघुराजा स्वारी करतो आहे हे समजल्यावर कुबेराने सुवर्णुद्रांचा पाऊस पाडला. त्यातून चौदा कोटी सुवर्णुद्रा घेऊन कौत्स गुरुदक्षिणा द्यायला निघून गेला. दान देण्यासाठी लढायला निघालेल्या रघुराजाने ‌‘मला माझ्यासाठी काहीच नको होते‌’ असे सांगून उरलेल्या सुवर्णुद्रांपैकी स्वत: काही घेतले नाही. ‌‘दिलेले परत घेणारनाही !‌’ असे म्हणून कुबेरानेही उरलेल्या सुवर्णुद्रा तशाच राहू दिल्या.

‌‘पाहिजे तेवढेच घेईन !‌’ असे म्हणणारा कौत्स, ‌‘माझ्यासाठी नाही ते मी घेणार नाही !‌’ असे म्हणणारा रघुराजा आणि ‌‘दिलेले परत घेणार नाही‌’ असे सांगणारा कुबेर हे सर्वच नि:स्पृहतेचे नमुने आहेत. अशी नि:स्पृहता जिथे असते तिथे या नि:स्पृह लोकांच्या चरितार्थासाठी दानधर्माची व्यवस्था समाजात तयार होते. देणाराही नि:स्पृह आणि घेणाराही नि:स्पृह. नि:स्पृहता गेली तर दान देण्याचे रूपांतर भीक घालण्यात आणि दान घेण्याचे रूपांतर भीक घेण्यात व्हायला वेळ लागत नाही.

स्वामी विवेकानंदांनी आणखी वेगळाच अनुभव सांगितला आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी भारत-भ्रणाच्या काळात ते सर्वत्र भिक्षेवर जगले होते; परंतु अमेरिकेतली पद्धत वेगळी. तिथे भिक्षा मागणे हा गुन्हाच समजला जाई. भिक्षा मागणारा चोरच समजला जाई. स्वामीजींच्या उदरनिर्वाहाचा भार उचलणारे अमेरिकन मित्र भेटेपर्यंत त्यांना स्वत: पैसे खर्च करून तिथे हॉटेलांध्ये राहावे-जेवावे लागत होते. यासाठी भारतातून पैसे मागवावे लागत होते.

स्वकष्टाने पैसा मिळवा आणि खर्च करा ही एक पद्धत. नि:स्पृह व्यक्तींची जबाबदारी समाजाने उचलली पाहिजे ही दुसरी पद्धत. एका पद्धतीत जे स्वावलंबनाने जगू शकत नाहीत त्यांची जबाबदारी शासनाने व धर्मादाय संस्थांनी उचलायची. दुसऱ्या पद्धतीत ही जबाबदारी प्रत्येक कुटुंबाने यथाशक्ती उचलायची. दोन्हीतले बरेवाईट ठरवणे कठीण. पण भाषा नि:स्पृहतेची करायची व मागणी आशाळभूतपणे करायची ही मात्र दांभिक कृती आहे. त्याचप्रमाणे भाषा दान-धर्माची करायची व अपेक्षा कोणत्यातरी स्वरूपातील परतफेडीची करायची हीसुद्धा दांभिक कृतीच आहे. उत्तमतेच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ? व्याकरणातला शब्द कदाचित वेगळा असेल. पण व्यवहारात उत्तमतेच्या विरुद्ध दांभिकता हाच शब्द योग्य होईल असे वाटते.

मनाची नि:स्पृहता कवा दान-धर्माची प्रेरणा ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वतंत्रपणे तयार होते. त्याचप्रमाणे स्वावलंबनाने व स्वाभिमानाने जगण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वतंत्रपणे तयार होते. त्या त्या प्रकारच्या इच्छेला कवा प्रेरणेला अनुकूल व्यवस्था समाजात तयार होते. स्वावलंबन आणि नि:स्पृहता यात तात्त्विक अर्थाने काही फरक नाही; परंतु व्यवहारात आहे. सर्वसामान्य लोकांना दैनंदिन व्यवहारात स्वावलंबनाचे पाठ गिरवावे लागतील. भारतीय समाजाचा आदर्श मात्र नि:स्पृहतेत आहे. स्वावलंबनाकडून नि:स्पृहतेकडे प्रवास चालू असताना दांभिकतेचा स्पर्श होणे म्हणजे उत्तमतेच्या विरुद्ध दिशेने जाणे.

वाङ्मयचौर्य, संशोधन-चौर्य, श्रेय-चौर्य ही देखील सर्व दांभिकतेची अप्रामाणिकपणाची विविध रूपे आहेत. आपल्याला उत्तमतेचा आग्रह धरताना श्रेय-चौर्यापासून विशेष सावध राहायला लागेल. न झालेल्या कामाचे श्रेय घेणे, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणे, कमी काम झालेले असताना जास्त झाल्याचे श्रेय घेणे, चुकीचे काम झालेले असताना बरोबर कामाचे श्रेय घेणे, एका हेतूने
केलेले काम दुसऱ्या हेतूने केल्याचे श्रेय घेणे, अभावितपणे झालेले काम हेतुपूर्वक केल्याचे श्रेय घेणे, हे सर्व श्रेय-चौर्याचे प्रकार आहेत. उत्तमता हवी म्हणताना कोणत्या गोष्टीत उत्तमता नाही हे कळले पाहिजे. श्रेय-चौर्य, अप्रामाणिकपणा, दांभिकता या सर्व गोष्टी उत्तमतेच्या शत्रू आहेत.