१२. कार्यकर्त्याचा पहिला गुण – दक्षता

प्रबोधिनीची वार्षिक सभा :

दि. 10 डिसेंबरला वार्षिक सभेध्ये प्रबोधिनीच्या कामासंबंधी मुक्तचिंतनाचे सत्र योजले होते. सदस्य, कार्यकर्ते व हितचिंतक धरून सुारे 120 जण सभेला उपस्थित होते. त्यापैकी 25 जणांनी मुक्तचतनात आपले विचार मांडले. या सभेत दीड वर्षांपूर्वी फुलगाव येथे सुरू झालेल्या भविष्यचतनाचा एक टप्पा पूर्ण झाला.‌ ‘काय करावे?‌’ याचा विचार एकवटत आणत भवितव्यलेख आपण तयार केला. हे सर्व मुक्तचिंतन सार्थ करायचे असेल तर जे करायचे म्हटले ते ‌‘कोणी करायचे‌’ याच्या निश्चितीला लागले पाहिजे. ‌‘काय करावे‌’ चा तात्पुरता शेवट व ‌‘कोणी करायचे‌’ चा नव्याने प्रारंभ करायचा आहे ‌‘कोणी करायचे‌’ ठरविताना ‌‘कोणी काय करायचे‌’ हे एकत्र चर्चेनेच ठरविता येईल; परंतु ‌‘ज्याने करायचे तो कसा पाहिजे‌’ याचे चतन प्रत्येकाला एकेकट्यानेही करता येईल. त्याचा प्रारंभ आता व्हायला हवा.

रिस्पॉन्सिबल म्हणजे दक्ष :

काम करणारा कसा पाहिजे याचा विचार करताना शून्यातून सुरुवात करण्याची गरज नाही. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षणांची पंचसूत्रीच आत्मपरीक्षणासाठी आणि स्वयंविकासासाठी वापरता येईल. या पंचसूत्रीतील पहिले सूत्र आहे – रिस्पॉन्सिबल. कार्यकर्ता जबाबदार असावा कवा उत्तरदायी असावा असे रिस्पॉन्सिबलचे भाषांतर करता येते. त्यापेक्षा अधिक अर्थ दक्ष या शब्दामध्ये आहे असे वाटले.

दूरदर्शनच्या पडद्यावर क्रिकेटच्या सामन्याचे प्रक्षेपण चालू असताना कॅमेरा फक्त क्रिकेटच्या चेंडूवरही केंद्रित होऊ शकतो आणि प्रेक्षकांसकट संपूर्ण क्रीडांगणही आपल्या कक्षेत आणू शकतो. छोट्याशा चेंडूपासून संपूर्ण क्रीडांगणावर पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ कॅमेरा रोखता येतो. पडद्यावर त्या वेळेपुरते तेच दृश्य दिसते. दृश्य कोणतेही दिसले तरी सामना चालूच असतो. एखादे काम करताना त्या कृतीवर लक्ष केंद्रित करणे, ते काम करत असताना स्वत:चे निरीक्षण करता येणे, आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडे लक्ष देता येणे, आपल्या तसेचशेजारच्या विभागाच्या विचार करता येणे, करत असलेल्या कामाचा संपूर्ण प्रबोधिनीवर कसा परिणाम होत आहे हे शोधता येणे आणि सगळ्या देशावर काय परिणाम होईल याचा अंदाज करता येणे हे सगळे काम करतानाच जमले पाहिजे. काम चालू असताना आपले लक्ष, हातातल्या कामापासून देशावरील त्याच्या चालू व संभाव्य परिणामापर्यंत पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ ज्याला वळवता येते त्यालाच ते काम उत्तम करता येईल. संदर्भाविना कामात लक्ष टिकून राहात नाही. सर्व संदर्भ लक्षात घेऊन केलेले काम उत्तमही होईल आणि अर्थपूर्ण झाल्यामुळे उत्साहही वाढवील. उत्तम काम केल्याने उत्साह वाढणे आणि परिणाम दिसायला वेळ लागला, तरी ससंदर्भ काम केल्यामुळे धीराने थांबता येणे म्हणजे दक्ष राहून काम करणे असे वाटते. असे काम करणाऱ्यावर कोणतीही जबाबदारी टाकावी. काम पूर्ण होईपर्यंत तो उत्तरदायी राहीलच. सर्व संदर्भांसह काम करणे म्हणजेच स-अवधान काम करणे. स-अवधान काम करणारा जिथे आपले लक्ष केंद्रित करेल, हातातल्या कृतीपासून देशाच्या परिस्थितीपर्यंत जे आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये आणेल त्यावरच त्याचे लक्ष एकाग्र होईल. रिस्पॉन्सिबल तो, जो कामाच्या बाबतीत
आपली अवधानशक्ती आणि एकाग्रता वाढवतो. या क्षमतांनाच कार्यकर्त्यांची दक्षता म्हणायची.