पद्य

पद्य निरूपणाची भूमिका

निरूपण – गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न) निरूपणे का लिहायला घेतली ? (दुसरा प्रश्न) पद्यांची निवड कशी केली ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे — सुमारे अकरा-बारा वर्षांपूर्वी ‌‘स्वतःला घडविण्यासाठी उपासना‌’ […]

पद्य निरूपणाची भूमिका Read More »

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे

निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण घेतल्याशिवाय, काही सराव केल्याशिवाय, नवे आव्हान पूर्ण करता येत नाही. शिक्षणक्षेत्रात बऱ्याच वेळा अनुभव येतो की उपजत स्मरणशक्तीच्या जोरावर सुरुवातीच्या परीक्षांमध्ये

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे Read More »

पद्य क्र. १५  दिव्य ध्येय की ओर तपस्वी

निरूपण – साध्या सोप्या चालीतले आजचे पद्य अनेक संघटनांमध्ये म्हटले जाते. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याचे त्यात एक साधक आणि तपस्वी म्हणून वर्णन केले आहे. मी १९८६ साली कोलकाता येथे काही दिवस मुक्कामी असताना योगसाधना करणाऱ्या तेथील एका महाराष्ट्रातील कार्यकर्त्याने या पद्यासंबंधी माझ्याशी बोलताना ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचे उदाहरण दिले होते. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात योगमार्गाचे

पद्य क्र. १५  दिव्य ध्येय की ओर तपस्वी Read More »

पद्य क्र. १४ – मातृ-भू की मूर्ति मेरे …

निरूपण – काही पद्यांमध्ये एखादा विचार प्रभावीपणे व्यक्त होतो. आतापर्यंत निरूपण केलेली बहुतेक पद्ये तशीच होती. पद्यातील विचारावर पुन्हा पुन्हा चिंतन केले की तो मनात खोलवर जाऊन रुजतो व त्याचे भाववृत्तीत रूपांतर होते. आजच्या पद्यामध्ये विचारापेक्षा भावनाच जास्त व्यक्त होतात. यातली मुख्य भावना देशभक्तीची आहे. मातृ–भू की मूर्ति मेरे हृदय मंदिर में विराजे ॥धृ.॥ एखाद्या

पद्य क्र. १४ – मातृ-भू की मूर्ति मेरे … Read More »

पद्य क्र. १३ अविरत श्रमणे हेच जिणे

निरूपण – प्रबोधिनीतल्या विद्यार्थ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी त्यांच्यामध्ये responsive, responsible, co-operative, creative आणि  regenerative  हे गुण विकसित झाले पाहिजेत असे कै. आप्पांनी म्हटले होते. ‌‘कार्यकर्ते बनूया‌’ या पुस्तिकेत या गुणांचे मराठी भाषांतर अनुक्रमे प्रतिसादी, उत्तरदायी, सहयोगी, नवनिर्मितीक्षम आणि प्रेरणासंक्रामक असे केले आहे. प्रेरणासंक्रामक म्हणजे इतरांमध्ये स्वतःच्या प्रेरणेचे संक्रमण करणारा. प्रेरणेचे संक्रमण म्हणजे

पद्य क्र. १३ अविरत श्रमणे हेच जिणे Read More »

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की…

निरूपण – आजचे पद्य हे संकल्प-गीत आहे. ‘जगाने हम चले’ हे त्याचे पालुपद आहे. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रेरणाजागरण करण्यासाठी आधी काय काय करायला हवे याच्या पायऱ्याच जणू काही त्यात सांगितल्या आहेत. जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥ जगन्माता म्हणजे परमेश्वर. जननी म्हणजे जन्मदात्री आई. आपण परमेश्वरालाही जगन्माता म्हणजे जगाची आईच

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की… Read More »

पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए …

निरूपण – प्रबोधिनीच्या दशवार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘आम्ही जाऊच जाऊ’  हे पद्य लिहिले गेले. त्यात एक कडवे नवतेज, नवक्षितिजे, नवस्वप्ने, नवीन कवने, नव्या कहाण्या, नवस्फूर्ती असा नाविन्याचा पुरस्कार करणारे आहे. प्रबोधिनीतील कवींनी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आणखी पाच पद्यांमध्ये एखाद्या कडव्यात नाविन्याचा उल्लेख आहे. मात्र अशा पद्यांमध्ये नाविन्यापेक्षा तेज, पराक्रम, राष्ट्रघडण, ध्येयाचा ध्यास, यशस्वी जीवन, विजयी

पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए … Read More »

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन

निरूपण – लौकिक जीवनात वाढदिवस, लग्न-समारंभ, सत्कार-समारंभ अशा प्रसंगी उत्तमातली उत्तम, सर्वात शोभिवंत, सगळ्यांपेक्षा वेगळी अशी भेटवस्तू उत्सवमूर्ती व्यक्तीला देण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. यासाठी केलेल्या कष्टांना, खर्चाला कोणी समर्पण किंवा त्याग म्हणत नाही. उत्सवमूर्तीला मोठा पुष्पगुच्छ, आकर्षक शुभेच्छापत्र किंवा सुंदर कलाकृती भेट देण्यासाठी जेवढे धडपडू, तेवढे स्वतःचे बलसंपन्न शरीर, सुदृढ मन आणि तरल बुद्धी समाजाकरता,

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन Read More »

हे कर्मयोगिन्

हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या असंख्यात ज्योतिर्दळे लावली जरी दाट अंधार आहे सभोती तरी आमुची वाट तेजाळली ॥ ध्रु. ॥दिली ध्येयनिष्ठा दिली कार्यनिष्ठा, मनी रेखलेली श्रमाची प्रतिष्ठा समाजार्थ निःस्वार्थ सेवा कराया तुम्ही त्यागदीक्षा आम्हाला दिली हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या कृतीने नवी प्रेरणा कोरली ॥ १ ॥ जेथे घोर अन्याय थैमान घाली तिथे धावुनी जा

हे कर्मयोगिन् Read More »

हे ऋषिवर श्रीअरविंद

हे ऋषिवर श्रीअरविंद, हे चिन्मय मधुरा माते युवशक्ति हिंदुराष्ट्राची, वंदिते आज तुम्हाते ॥ ध्रु. ॥ वेड एक होते तुम्हा, मातृभूमिच्या मुक्तीचे उग्र खड्ग झाला तुम्ही, जागृत भारतशक्तीचे ‘व्हा सिद्ध संगरा’, वदला, ‘सांडूनि भ्रांति-मोहाते’ ॥ १ ॥द्रष्ट्या प्रतिभेने तुमच्या, स्वप्ने आम्हासी दिधली ‘ही अखंड होइल भूमी, जरि खंडित आता दिसली,संजीवन अध्यात्माचे, देईल तृषित विश्वाते’ ॥ २

हे ऋषिवर श्रीअरविंद Read More »