Pune Centre


नागरी वस्ती अभ्यासगट:

राष्ट्रीय एकात्मता ज्ञान प्रबोधिनीच्या कार्याची एक महत्वाची दिशा आहे. पुण्याच्या नागरी भागात देशभरातील जास्त करून महाराष्ट्रातील अनेक गावांमधील कुटुंबे राहतात. ती अठरापगड समाज गटातील आहेत. त्यांच्या सोबत हा विभाग काम करत आहे. कुटुंबातील सर्व वयोगटातील स्त्री पुरुष सदस्याबरोबर संवाद व काम करण्याची  योजना असते. विविध जाती जमातीतील लोकांचे जीवनमान व जीवन संघर्ष अडी-अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व मदत करत आहेत. व्यक्तींमधील क्षमता ओळखून त्या वाढविण्याला शिकवणे, तसेच देशप्रेम वाढविणे व लोकांना विकासासाठी कृतीशील करणे हे काम अभ्यासगट करतो. २००२ ते २०२१ या २० वर्षांमध्ये २२,१०२ व्यक्तींबरोबर विभागाने काम केले आहे .

मुख्य आठ उपक्रम : 

१. वस्ती भेटी : संपर्क संवाद समाजदर्शन,सर्व्हे : गरजा, आस्था, प्रश्नांचा अभ्यास 

२. सल्ला प्रशिक्षण केंद्र -  वैयक्तिक व गट समुपदेशन 

३. प्रेरणा जागृती कार्यक्रम (किशोर/किशोर, युवती, महिला)

४. व्यक्तिमत्व विकास शिबिरे 

५. नेतृत्वगुण विकसनासाठीचे उपक्रम 

६. समाज ऐक्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम 

७. उद्योजकता विकास   

८. सेवा योजना - आरोग्य  व अन्य मदत कार्य    

नैसर्गिक संसाधने विभाग :
 

भोर व वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील दुर्गम गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या  उपक्रमावर गेली काही  वर्षे ग्राम विकसन विभागातर्फे सातत्याने विशेष भर देण्यात येत  आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीचा आधार घेण्यात येत आहे. पाणीटंचाई निवारणाच्या या उपक्रमात झरे विकास, नवीन विहीर खोदाई, जुन्या विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण, नवीन नळपाणी पुरवठा योजना, जुन्या नळपाणी योजनेची दुरुस्ती, पाणी साठवण टाकीचे बांधकाम आदी विषय लोकांच्या सहभागातून हाताळण्यात येत आहेत. श्रमदान व लोकवर्गणी याआधारे प्रत्येक गावाचा सहभाग निश्चित करण्यात येत असतो. कामापोटी येणाऱ्या खर्चाच्या मोठ्या रकमेची तजवीज  मात्र पुण्यातील विविध कंपन्यांचा  सीएसआर निधी, रोटरी क्लब, ईनरव्हील क्लब व वैयक्तिक देणगीदार यांच्या माध्यमातून करण्यात करण्यात येत असते. 

पुणे जिल्यातील भोर, वेल्हे व मुळशी या तीन तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ३२ विहिरी व २४ फेरोसिमेंट टाक्यांचे बांधकाम लोकसहभागातून पूर्ण झालेले आहे. विभागातर्फे सौर उर्जा प्रसाराचेही काम केले जाते. यात सौर लॅमिनेटरची निर्मिती करून त्याद्वारे सौर पॅनेल जुळणीचे प्रशिक्षणही देण्यात येते. याचबरोबरीने ग्रामीण तसेच नागरी वस्त्यांमधील  युवकांना व महिलांना सौर दिव्यांच्या जुळणीचे प्रशिक्षण देण्यात येते.


प्रज्ञा मानस संशोधिका

ज्ञान प्रबोधिनीज् इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी (JPIP) ज्ञान प्रबोधिनी संस्थेची ची मानसशास्त्र क्षेत्रातील सहयोगी संस्था असून ती ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेचा भाग आहे. बुद्धिमत्तेचा शोध आणि संवर्धन हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी PhD चे संशोधन केंद्र म्हणून संलग्न आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचे कार्य विस्तारलेले असून संस्थेचे काम भारत आणि परदेशातील विविध स्तरातील लोकांपर्यंत पोहचले आहे. ह्यात मानव संसाधन विकास, शालेय व शैक्षणिक मानसशास्त्र, भारतीय मानसशास्त्र, संघटनात्मक वागणूक, लिंगभाव संकल्पना, संरक्षण मानसशास्त्र आणि प्रतिभा विकसन  यावर संशोधन चालू असते. बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता, वाचन / अभ्यास कौशल्य, शालेय वातावरण, सर्जनशीलता, नेतृत्व, महिला अभ्यास, भावनिक/ वर्तनात्मक बुद्धिमत्ता, पालकत्व, योग, सामाजिक जागरूकता, समाधान संकल्पना अशा संशोधन विषयांचा समावेश आहे. 

 

JPIP अग्रगण्य उद्योगांना त्यांच्या भरती, नियुक्ती, पदोन्नती आणि जीवन कौशल्यांमध्ये प्रशिक्षण असे सहाय्य करते. संस्थेचे समुपदेशन आणि मार्गदर्शन केंद्र आहे आणि त्यामध्ये मुलांसाठी अभिक्षमता मापन करणारा स्वतंत्र  विभाग आहे. तसेच ७ ते १२ वयातील मुलांसाठी प्रज्ञा विकासाचे निरंतर प्रशिक्षण उपक्रम चालू आहेत. ह्यासोबत अनेक  सेमिनार, परिषदा, संशोधनाशी संबंधित शैक्षणिक उपक्रम चालवले जातात. संस्था संशोधनासाठी  अनेकांना मार्गदर्शन आणि सल्ला सहाय्य उपलब्ध करून देते. 

 
 
 

 

Salumbre

A joint venture of Pune North Rotary charitable trust and Jnana Prabodhini
A leading secondary school under the guidance of Jnana Prabodhini in the Mawal block of Pune dist....

Solapur

Marathi  and Semi-English medium School from pre-primary to  std. X...

Harali

Comprehensive rehabilitation work after the 1993 Killari earthquake. An Agriciulture-based Educational Centre at Harali in Osmanabad district....

Pune

A school with a purpose to develop the leadership qualities of gifted students....

Nigdi

 A multi-dimensional centre imparting quality education in the Pimpri-Chinchwad indutrial area 
A Marathi and English medium school for 2500 students from pre-pimary to std X...

Jnana Prabodhini Prashala

A school with a purpose to develop the leadership qualities of gifted students. Affiliated to CBSE, mixed (English and Marathi medium), std V to X : 480 girls and boys....