Samaj jagaran abhiyan
ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित "समाज जागरण अभियान" उपक्रमात आपले स्वागत!
१४ व १५ एप्रिल २०२१ या दोन दिवशी "समाज जागरण प्रश्नमंजूषा" सर्वांसाठी खुली असणार आहे!
प्रश्नमंजूषा सोडवण्याविषयी सूचना:
१) प्रश्नमंजूषा सोडवण्यासाठी वेळेची मर्यादा नाही. १४ व १५ एप्रिल या दोन दिवसांत कधीही येऊन आपण प्रश्नमंजूषा सोडवू शकाल.
२) भारताला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेले काही सोपे, काही आव्हानात्मक प्रश्न या प्रश्नमंजूषेत आहेत. ते सोडवताना आपल्याला अतिशय मजा येईल व नवीन काही शिकायलाही मिळेल अशी खात्री आहे.
३) प्रश्नमंजूषा अ, ब, क, व ड अशा चार संचांमध्ये विभागली आहे.
प्रश्नसंच अ: ५० प्रश्न
प्रश्नसंच ब: १०० प्रश्न
प्रश्नसंच क: ५० प्रश्न
बोनस प्रश्नसंच ड: ३५ प्रश्न
४) अ, ब, क यांपैकी कुठल्याही प्रश्नसंचापासून आपण सुरुवात करू शकता. खाली त्यांच्या "गुगल फ़ॉर्म्स्"च्या लिंक्स उपलब्ध आहेत, त्यावर क्लिक करून प्रश्नमंजूषेला सुरुवात करावी. एक प्रश्नसंच सोडवल्यावर इतर दोन संचांच्या लिंक्स फ़ॉर्मवर उपलब्ध होतील, तसेच या वेबसाईटवर लिंक्स् कायम उपलब्ध असतील.