Bhor Vihir Lokarpan Sohla

दिनांक २६.१.२०२० रोजी साळुंगण, ता. भोर, जि. पुणे या गावात विहीर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या विहीर बांधकामला केपीआयटी या  IT  क्षेत्रातील कंपनीने अर्थ सहाय्य केले आहे. केपीआयटी कंपनीचे  मुख्य अधिकारी श्री किशोर पाटील,  CSR   प्रमुख श्री तुषार जुवेकर आणि दोन कर्मचारी या कार्यक्रम ला उपस्थित होते.
ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह आणि अर्थ विभागाचे प्रमुख मा. विसुभाऊ गुर्जर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले होते.
ग्रामविकसन विभागाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रम ला उपस्थित होते.
श्री किशोर पाटील हे प्रबोधिनीच्या १९७७च्या तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत.