Ganesh Pratishthapana

श्रीगणेश प्रतिष्ठापना कार्यक्रम
दि. २ सप्टेंबर २०१९, सोमवार रोजी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना न्यायमूर्ती मा. श्री. दिलीप देशमुख, धर्मादाय सहआयुक्त, पुणे  व त्यांच्या पत्नी सौ. दीपाली  देशमुख  यांच्या हस्ते  संपन्न  झाली. या प्रसंगी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना धर्मादाय आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली व त्यात सहभागी होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. आ. संचालक गिरीशराव बापट यांनी दिलीपजींचे स्वागत केले व आभार मानले.