jagatik mahila din movie

स्त्री शक्ती प्रबोधन

movie

जागतिक महिला दिनानिमित्त  स्त्री शक्ती प्रबोधन गटाच्या १७९ जणींनी अभिरुची सिटी प्राईडला आनंदी गोपाळ हा सिनेमा नाममात्र शुल्क देऊन बघितला.
यासाठी नागरवस्ती, संवादिनी पुणे, पौड रोड, मध्यवर्ती कार्यालय, युवती विभाग, नेतृत्व संवर्धन या विभागातील सदस्यांचे प्रतिनिधित्व होते. त्याशिवाय वेल्हे महिला बालकल्याणच्या २ अधिकारीही होत्या.

विशेष म्हणजे३८ गावातून १५०+ जणी स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण मधल्या आल्या होत्या. ७०-८० जणी अशा प्रकारे थिएटरमध्ये येऊन आयुष्यात प्रथमच सिनेमा बघत होत्या.