kishori vikas prakalp nigdi students

​किशोरी विकास उपक्रम
किशोरी विकास उपक्रमाअंतर्गत सोंडेमाथना व मंजाई आसनी शाळेत विद्याव्रत घेणार आहोत. या दोन्ही शाळेतील मुलींच्या गृहभेटी काल रात्री झाल्या.   ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या शाळेतील इयत्ता ९ वीचे विद्यार्थी/विद्यार्थिनी काल मेळावे घेण्यासाठी गावोगावी गेली होती.
त्यांच्यासोबत तीन मार्गदर्शिका व एक दादा अशा चौघांनी सोंडे माथना, वडगाव झान्जे, दामगुडा आसनी, मंजाई आसनी व कोदवडी या पाच गावातून बारा मुली व दोन मुलांच्या घरी भेट दिली. गृहभेटीचे अनुभव खूपच छान होते.

nigdi gramin melave

मंजाई आसनी गावात तर प्रबोधिनीतून गेलेल्या मुलांचे सगळ्या गावानेच स्वागत केले. तिथल्या ८ वी  आणि ९ वीच्या मुलांनी आपापली वर्गणी एकत्र गोळा करून किराणा आणला. मंजाई आसनी शाळेतील सर्व मुलं व निगडीची ८ मुलं १ शिक्षक मंदिरातच एकत्र राहिले.  जेवणानंतर स्पिकर व्यवस्था प्रबोधीनीतून आलेल्या लोकांचा सत्कार करणे ह्या सगळ्याची तयारी मंजाई आसनीतल्या मुलामुलींनी केली होती हे  खूपच विशेष होतं. 
 गावात घरोघरी जाऊन कार्यक्रमाला या असं लोकांशी बोलणं या सगळ्याचा अनुभव प्रबोधिनीतल्या मुलांना या गावात घेता आला . मुलींच्या "प्रिय महान हिंदुस्थान"  या पद्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नवनाथदादांनी ' शिवरायांचे गीत गायले तर निगडीच्या मुलाने छान पोवाडा म्हटला. हळुहळू गावातील ३०-४० लोकं कार्यक्रमाला जमली व अतिशय कमी वेळात सराव करून 'तंबाखू'  या विषयावरचं जाणीवजागृतीचं पथनाट्य निगडीच्या मुलांनी उत्तम सादर केलं. 
काल या गावात गेल्यावर काहीतरी सण असल्याचा भास होत होता असं वातावरण होतं.