kpit training

दि.२८ नोव्हेंबर २०१८ रोजी केपीआयटीच्या ३२ अभियत्यांचे विज्ञान संकल्पना प्रशिक्षण झाले. इ.८ वी साठी चुंबकत्व  व इ.९ वी साठी प्रकाश या विषयांवर आधारित हे प्रशिक्षण होते. 
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पंधरा शाळा व मुळशी तालुक्यातील  पाच शाळा अशा एकूण वीस शाळांमध्ये जाऊन हे अभियंते विज्ञान संकल्पना शिकविणार आहेत.  
आठवी व नववीसाठी प्रत्येकी वीस असे एकूण ४० संच तयार करून दिले आहेत.
सदर विज्ञान संकल्पना इ.८ वी व इ. ९ च्या अभ्यास क्रमावर आधारित आहेत.