नागरी वस्ती अभ्यासगटातर्फे रविवार, दिनांक १३/१/२०१९ रोजी ५ वा कुमार मेळावा आणि त्यालाच जोडून ४ ते ६ यावेळात युवक मेळावा झाला.
नावनोंदणी, थोड्या गप्पा, माहितीचे फॉर्म भरून झाल्यावर मातृभूमी पूजन झाले, अजिंक्यदादा गोखले याने पोथी सांगितली.
त्यानंतरच्या सभेत हर्षाताईंनी प्रस्तावना केली आणि श्रीरंगदादा टोके याने विवेकानंदांचे विचार गोष्टी रुपात मांडले. उपस्थितांच्या मनोगतांनंतर समारोप होऊन प्रार्थना झाली व अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपला.
चार वस्त्यांमधून एकूण ६० कुमार आणि युवक मेळाव्यात सहभागी झाले होते.