Prajasattak din vishesh

दिनांक २६ जानेवारी २०२० : प्रजासत्ताक दिनाच्या  निमित्ताने  तीन ठिकाणी कार्यक्रम झाले.  
१. जनता वसाहत, पर्वती पायथा 
 २. कम्युनिटी सेंटर, केशवनगर  
 ३. महात्मा फुले वस्ती हडपसर 
येथे विविध सांस्कृतिक  कार्यक्रम झाले .यात  समूह गान , समूह नृत्य, भाषण , यात विद्यार्थ्यांनी मोठ्या  उत्साहाने सहभाग घेतला. भारत फोर्ज द्वारा व्यसनमुक्ती या विषयावर चित्रकला स्पर्धा झाली होती. त्याच्या बक्षीस वितरणासाठी भारत फोर्ज कंपनीचे अभियंते उपस्थित होते.  जनता वसाहत मध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली. भारत फोर्जचे अजित कोलते, तसेच कलशेट्टी हे दोन अभियंते उपस्थित होते. 
त्यांनी विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला. ते स्वतः कसे शिकले याबाबत माहिती दिली. तसेच व्यसनांपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.    ज्ञान प्रबोधिनीचे  प्रा. दीपक कांबळे, ओंकार बाणाईत, यांनी जनता वस्तीतील मुलांना विविध स्पर्धेतील बक्षिसे दिली. 
NMMS या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन  कौतुक केले.  पल्लवी वीर-पवार यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. 
महात्मा फुले वस्ती येथे भारत फोर्ज चे श्री. दीपक फुगे व श्री.  बाळकृष्ण गुंजाळ हे दोन अभियंते उपस्थित होते. 
त्यांनी मुलांनी काढलेल्या चित्रांचे कौतुक केले. प्रश्न विचारले ,सर्व गटाला  व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी काही मुलांनी गाणी, नृत्य, भाषण सादर केले.  ज्ञान प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थी डॉ. नीलिमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर गोष्टी सांगितल्या.  
अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांना निबंध, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
तसेच प्रज्ञा विकास कार्यक्रमात झालेल्या चित्रकला स्पर्ध्येची बक्षिसे देण्यात आली. व वेताळबाबा वस्तीतील विद्यार्थ्यांनी  NMMS या परीक्षेत मिळविलेल्या यशा बद्दल बक्षीस देऊन  कौतुक केले.  नगरसेवक सौ.उज्वला ताई जंगले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 
ज्ञान प्रबोधिनीचे प्रा. प्रकाश रणनवरे , ओंकार बाणाईत, तसेच मनीषा ताई वाघमारे, दीपक वाघमारे याप्रसंगी उपस्थित होते.  निरंजना ताई मुळे व संजय पोटे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.  
अनुभव शाळा व प्रज्ञा विकास यांचा हा संयुक्त कार्यक्रम योजला होता. 

 केशवनगर कम्युनिटी सेंटर येथे देखील संयुक्त कार्यक्रम झाला. 
भारत फोर्जच्या कम्युनिटी सेंटरच्या प्रमुख  श्रीमती कदम  या प्रमुख पाहुण्या होत्या. गायरान वस्ती अनुभव शाळा, केशवनगर प्रज्ञा विकास मधील विद्यार्थी यानी विविध कार्यकम सदर केले.  अनुभव शाळेच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. 
केशवनगर येथील वस्तीतील दोन विद्यार्थिनीनी  NMMS या परीक्षेत मिळविलेल्या यशा बद्दल बक्षीस देऊन  कौतुक केले. केशवनगर ला प्राजक्ता वांगणनेकर, अंजली पाटील, संगीता पारधे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. 

ओंकार बाणाईत यांनी तीनही ठिकाणी उपस्थित राहून उपस्थित पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. प्रज्ञा विकास व अनुभव शाळा या दोन्ही  कार्यक्रमाच्या बद्दल माहिती दिली.  पालकानी मोठ्या संखेने उपस्थित राहून सर्वांचा उत्साह वाढविला.