Sangali Kolhapur Madatkarya

सांगली कोल्हापूर मदतकार्य
ज्ञान प्रबोधिनी नावनागर विद्यालय निगडीचे भेंडवडे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथ आपत्ती निवारण काम सुरु झाले.
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे शिक्षक, पालक आणि परिसरातील मित्र परिवार गट यांचेतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सुरु झाले आहे. काल श्री डुंबरे, श्री सादूल सर आणि युवक हृषीकेश मापारी, अनुज देशपांडे यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहाणी केली. गावची लोकसंख्या सुमारे ७००० घरं १२०० पैकी   सुमारे ५०० घरं पूरबाधित आहेत, ४० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. गाव शहरापासून २५ दूर हायवेपासून ६ कि.मी. पूर्वेकडे आहे. पाणी ओसरायला लागले आहे. तेव्हा लोकांना घरं स्वच्छ करून देणे, रस्त्यावरील राडारोडा साफ करणे, अशी प्राथमिक कामे १३ ऑगस्ट पासून सुरू झाली.बारा कार्यकर्त्यांची पहिली टीम मदतकार्यासाठी निघाली  १५ अॉगस्टला ४० जणांची टीम तयार आहे. या कामात श्रमदानासाठी सहभागासाठी सर्वांना आवाहन ! पुढील लिंकव्दारे आपली नावनोंदणी करू शकता. 
आपण  या गावाचे संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत किमान एक महिना या गावांत काम करणार आहोत. या कामासाठी आर्थिक मदतीचीही आवश्यकता आहे. यासाठी पुढील शाळेच्या अकाउंटवर देणगी देऊ शकता. त्यासाठी आपणांस 80 G पावती मिळू शकेल. 
पूर-आपत्ती निवारण समिती,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र.
पालक महासंघ,
मित्र परिवार, प्राधिकरण.

 
Read news at : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScKrl2I6fNkN4LXsrNndtGPh0yvrKrNnHVszaR19piIlW7uuA/viewform