sanvadini padayatra

                               संवादिनी

ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन या दिशेने काम करणारा शहरी महिलांचा  साजरे करत आहे.त्याचा शुभारंभ आज सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून झाला.
आज महात्मा फुल्यांच्या महिला शिक्षणाचा प्रारंभ जिथून झाला अशा भिडे वाड्यापासून ते फुलेवाड्यापर्यंत सकाळी ९.३०  ते १२.३० यावेळात पदयात्रा आयोजित केली होती.
भिडे वाड्यापाशी सावित्रीबाईंची गोष्ट सांगून पदयात्रेस सुरुवात झाली.
मध्ये शाहू चौकात मुलगी वाचवा मुलगी वाढवा ह्या पथनाट्याचे सादरीकरण झाले.
फुलेवाड्यात पोचल्यावर महात्मा फुले यांच्या प्रसिद्ध नसलेल्या गोष्टी संवादिनी कार्यकर्त्या नीलिमा ताई रास्ते यांनी सांगितल्या. आ.महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वीणाताई लिमये आणि सुलभाताई मराठे यांनी मा. स्वर्णलता भिशीकर यांनी रचलेल्या सुम्बरानाचे सादरीकरण केले.
या पदयात्रेत संवादिनी गटाच्या सुमारे ७५ सदस्या उपस्थित होत्या.