sanwadini kutumb melava

ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (शहरी )या दिशेने काम करणाऱ्या  संवादिनी या गटाच्या ज्ञान प्रबोधिनीत चालणाऱ्या गटाचे द्विदशकपूर्ती वर्ष सुरू आहे. या निमित्ताने सर्व संवादिनी सदस्यांच्या कुटुंबांचा एक मेळावा दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत झाला.
यामध्ये ८५ सदस्यांचे साधारण २५० ते २७५ कुटुंबिय सहभागी झाले होते. अगदी वय वर्षे २ ते वय वर्षे ८० पर्यंतचे कुटुंबिय यासाठी उपस्थित होते. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक  मा. गिरीश बापट, कार्यवाह मा. वि. शं /सुभाष देशपांडे, सहकार्यवाह मा. विश्वनाथ गुर्जर , मा. हर्षा किर्वे, मा. महेंद्र सेठिया यांची उपस्थिती होती. 
विशेष म्हणजे संवादिनीचं बीज मा. अनघाताई लवळेकर यांच्या बरोबर ज्यांनी रोवलं त्या कै. विद्याताई करंबळेकर यांचे आई - वडील, आणि त्यांचे कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आरतीताई देवगांवकर यांनी लिहिलेल्या  आणि सीमंतिनीताई जहागीरदार यांनी संगीतबद्ध केलेल्या नवीन पद्याने कार्यक्रमाची सुरवात झाली. 
 गटागटात कुटुंब परिचय करून घेताना  " ती संवादिनीत आल्या पासून.... " यावर कुटुंबिय भरभरून बेलले. त्यातून इतर कुटुंबांना आणि काही अंशी त्या कुटुंबालाही संवादिनी मैत्रिण नव्याने कळायला मदत झाली. "आपल्याला समजलेली प्रबोधिनी" या बद्दलच्या गट चर्चेतून   प्रबेधिनी कुटुंबापर्यंत किती पोहोचली आहे हे कळायलाही मदत झाली. मा. महेंद्रभाईंच्या " संवादिनी माझ्या नजरेतून" या संवादिनीच्या वाटचाली बद्दल़च्या संवादातून, संवादिनीचा ज्ञान प्रबोधिनी संघटनेतील प्रवास आणि योगदान स्पष्ट झाले.  
या नंतर गेल्या वर्षात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार संवादिनी सदस्यांना कृतिशील संवादिनी पुरस्कार मा . गिरीशराव आणि मा. सुभाषरावांच्या हस्ते देण्यात आले. मान्यवरांचा उपस्थितांशी संवाद होऊन समारोप झाला.
 संवादिनी द्विदशकपूर्ती वर्षातला हा तिसरा कार्यक्रम सर्वांच्या सहभागाने अतिशय नेटका असा पार पडला