tamboo shibir kalpna chawala dal

कल्पना चावला दल
तंबू शिबिर २०१९

कुसगावात १ ते ५ जानेवारी मध्ये झालेलं तंबू शिबिर म्हणजे मुली आणि मार्गदर्शक ताई यांच्यासाठी अनुभवांची मोठी शिदोरीच होती.

आदर्श गावांच्या प्रतिकृती तयार करणे, सायकलींवर टांग मारून गावांत वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करायला जाणं, आल्यावर सगळ्याची केलेली गटचर्चा, रात्री फिरायला जाऊन मारलेल्या गप्पा, ऐकलेलं संगीत, पहाटेची उपासना, सकाळी थंडी घालवण्यासाठी खिंडीपर्यंत पळून येणं, रंगलेल्या पथकशः स्पर्धा , निसर्गाशी केलेला मौनसंवाद, सोडवलेली बौध्दिक कोडी, परिस्थितीशी सामना करत गावांना दिलेल्या भेटी, तिथे जुळलेली नाती, सांभाळलेल्या जबाबदाऱ्या, चुलीवरचा स्वयंपाक, विहिरीतून आणलेलं पाणी, शेकोटीभोवती म्हटलेली पद्यं आणि बोगद्यापासून लागलेला उतार..
अगदी सगळंच अविस्मरणीय!
खूप धमाल केली सगळ्यांनी!!