tambu shibir pratidnyagrahan

 
दिनांक २४-२५ डिसेंबर २०१८ या दिवशी बोरावळे गावात ग्रामीण महिलांचे तंबूतले निवासी शिबीर झाले. येऊन-जाऊन १२० जणी सहभागी झाल्या होत्या.  त्यापैकी ७२ जणी निवासी होत्या.  या शिबिरात एकूण ३७ महिलांनी प्रतिज्ञा घेतली. २९ महिलांनी प्रथम प्रतिज्ञा घेतली. सहा महिलांनी द्वितीय प्रतिज्ञा घेतली. दोन महिलांनी तृतीय प्रतिज्ञा घेतली. भोर वेल्हे हवेली या तालुक्यातील ५२ गावांचे प्रतिनिधीत्व होते.
त्यात डॉक्टर  बिंबा कानिटकर यांनी चाळीशीचे महिलाआरोग्य या विषयावर सत्र घेतले, संध्याकाळी गटचर्चा झाली, रात्री नाटक सादरीकरण केले. सकाळी प्रबोधिनीचा प्रतिज्ञा ग्रहणाचा कार्यक्रम झाला.
उद्घाटन  ज्ञान प्रबोधिनीचे  कार्यवाह मा. सुभाषराव आले होते तर प्रतिज्ञा ग्रहणाला संचालक मा. गिरीशराव आले होते.
 
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
* कार्यक्रम ग्रामीण महिलांच्या तंबूतील निवासी शिबीराचा होता. ( ५०गणवेशात)
* नऊवारी ते सलवार ...३पिढ्या सहभागी होत्या.
*३१ गावांचे प्रतिज्ञीतांमध्ये प्रतिनिधीत्व होते.
* शासकिय भाषेत सांगायचे तर कातकरी, धनगर आणि अन्य मागास जातींचे प्रतिनिधीत्व होते.
* बचत गट कार्यकर्त्या अशा निरक्षर महिला सुध्दा होत्या.
* प्रतिज्ञीत प्रत्येक जण किमान २ वर्ष कामात आहे तर तिचा  बैठकीमध्ये नियमित सहभाग आहे अशीच आहे.
'आमच्या गावात आम्हीच प्रबोधिनी!' असं म्हणणारी प्रत्येक जण होती.
* हे तंबू शिबीर प्रतिज्ञेची तयारी करण्यासाठी होतं. १००% लोकसहभाग अगदी प्रबोधिनीच्या वाहन आरक्षणाची रक्कम सुध्दा in kind जमा!  (या शिबीराचा १रु.  खर्च सुद्धा प्रबोधिनीला आला नाही.)