धर्मविधींच्या अंतरंगात

प्रत्यक्ष धर्मविधी करताना ….

मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की  धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त रूप होय. विविध संस्कार, शांती, पूजा म्हणजे तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देण्याचाच एक प्रयत्न  होय. मात्र या सर्व विधींमधे स्थलकालानुरूप परिवर्तन झाले पाहिजे. ते का व कसे झाले पाहिजे हेही […]

प्रत्यक्ष धर्मविधी करताना …. Read More »

परिवर्तन का व कसे ?

       मागील तीन प्रकरणांमधे आपण धर्म म्हणजे काय, धर्मामधे स्थल-कालातीत  तत्त्वांप्रमाणेच, स्थलकालसापेक्ष सत्यासारखे तत्त्व एका ठिकाणी लागू असून अन्य कोठे ते लागू पडत नाही असे नाही. याला म्हणतात ‘‌‍‍‌‌स्थलनिरपेक्ष‌’ अमक्या वेळी हे तत्त्व योग्य आणि अन्य वेळी अयोग्य याचा अर्थ ‌‘कालनिरपेक्ष‌’ आचारधर्म मात्र जागोजागी, वेळोवेळी बदलताना दिसतात व तसे ते पुढेही दिसणार याचा अर्थ ‌‘स्थलकालसापेक्ष‌’.

परिवर्तन का व कसे ? Read More »

शांती व पूजा

शांती        शांती हा शब्द ‌‘शम्‌‍‌’ धातूपासून बनलेला असून त्या धातूचा अर्थ  वाईट प्रभाव हटवणे, शमन करणे, प्रसन्न किंवा संतुष्ट करणे असा होतो. शम्‌‍ धातूच्या या विविध अर्थांच्या प्रकाशात शांती शब्दाचा अर्थ शोधू लागल्यास मनात उत्पन्न होणाऱ्या चांगल्या विचारांच्या योगे अशुभाचे सावट, संकटांची भीती व वाईट विचारांचा  प्रभाव हटवणे, चित्तामधील क्षोभ शांत करून ते प्रसन्न

शांती व पूजा Read More »

षोडश संस्कार

२. षोडश संस्कार        सम्‌‍ उपसर्ग असलेल्या ‌‘कृ‌’ या धातूपासून संस्कार हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ चांगले करणे, शुद्ध करणे, सुंदर करणे असा होतो. हा अर्थ आपल्याला एका उदाहरणावरून समजून घेता येईल. खाणीतून जेव्हा सोने काढले जाते तेव्हा ते शुद्ध स्वरूपाचे नसते. त्यामधे हीण मिसळलेले असते. या सोन्यावर अग्निसंस्कार करून त्यातील हीण काढून टाकून

षोडश संस्कार Read More »

धर्म

धर्म नेहमीच्या भाषेमधे आपण हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असे शब्दप्रयोग करत असतो. येथे धर्म शब्द आपण उपासनापद्धती म्हणून वापरतो. धर्म शब्दाचा खरा अर्थ मात्र उपासनापद्धती असा नव्हे. ‌‘धृ‌’ म्हणजे धारण करणे या अर्थाचा संस्कृत भाषेतील धातूपासून धर्म शब्द बनला आहे. व्यक्ती आणि समाजाच्या धारणपोषणास कारणीभूत होतो तो धर्म. ज्या नियमबंधनांच्या योगे समाजव्यवस्था टिकून

धर्म Read More »