TISS Hub Center


                                                            ज्ञान प्रबोधिनी
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम
बाल व वृध्द सेवा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष संधी !
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) व ज्ञान प्रबोधिनी यांच्या तर्फे संयुक्तपणे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरु होत आहे.

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (TISS) ही भारतातली अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. तिला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा असून मानव संसाधन मंत्रालय, भारत सरकार यांचीही मान्यता आहे. ‘स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ हा या संस्थेतील एक विभाग आहे. समाजातल्या बदलत जाणाऱ्या व्यावसायिक गरजा ओळखून या संस्थेने २०११ पासून अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून येत्या शैक्षणिक वर्षा पासून- (२०१६-२०१७) या संस्थेने ज्ञान प्रबोधिनीच्या समन्वयाने दोन अभ्यासक्रम पुण्यात राबविण्याचे ठरविले आहे. या अभ्यासक्रमामुळे समाजातल्या वंचित / संधीच्या अभावामुळे मागे पडणाऱ्या मोठ्या गटाला उपयुक्त असे शिक्षण आणि अधिकृत विद्यापीठ प्रमाणपत्र मिळणार आहे. यात तरुणांच्या बरोबरीने शिक्षणात खंड पडलेल्या प्रौढ सदस्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. या अभ्यासक्रमांची माहिती या प्रमाणे –

 
 अनु.  अभ्यासक्रमाचे नाव शैक्षणिक पात्रता   कालावधी
१. बाल विकास – पदवी अभ्यासक्रम १२ वी उत्तीर्ण  ३ वर्षे
 २.  वृद्धसेवा – पदविका अभ्यासक्रम  १० वी उत्तीर्ण  १ वर्षं
 
 
 
 

*अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
 • मर्यादित शुल्क. समाजातील विशेष प्रवर्गा साठी सवलतीची रचना.
 • वरील दोन्ही अभ्यासक्रमांसाठी वयाची कुठलीही अट नाही.
 • नोकरदार आणि गृहिणींच्या सोयीच्या वेळेत.
 • पुस्तकी अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव.
 • तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन.
 • टाटा इन्स्टिट्यूट आणि ज्ञान प्रबोधिनी सारख्या नावाजलेल्या संस्थांचे पाठबळ.
 • बालक आणि वृद्धसेवा क्षेत्रात रोजगाराची संधी.

  माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा. 
  बाल विकास – पदवी अभ्यासक्रम
  वृद्धसेवा – पदविका अभ्यासक्रम
 
  संपर्क
मेधा इनामदार
ज्ञानप्रबोधिनी ५१०, सदाशिव पेठ, पुणे.
फोननं.:(०२०)२४२०७१३३/७७४५०४११९६