Upcoming Eventज्ञान प्रबोधिनी, पुणे तर्फे - विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य विकसनासाठी : शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग (दि.२३ नोव्हेंबर, २०१९)

सस्नेह नमस्कार, 
'समृद्ध शिक्षणातून समर्थ भारत' या उद्दिष्टाने ज्ञान प्रबोधिनीतर्फे वेळोवेळी विविध विषयांवर शिक्षक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी वाचन हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. परिणामकारक अध्ययनासाठी थोड्या वेळात नेमके व जास्तीत जास्त वाचता येणे अतिशय महत्त्वाचे ठरते. वाचन हे माहिती मिळवण्याचे, इतरांचे विचार समजून घेण्याचे साधन आहे. विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्य विकसित व्हावे याकरिता वाचन समृद्धी रुजवण्याची तंत्रे व पद्धती यांची अध्यापकांना करून देणे महत्त्वाचे ठरते.
यासाठी ज्ञान प्रबोधिनीतर्फे दि. २३ नोव्हेंबर, २०१९ रोजी ‘वाचन कौशल्य विकसन’ प्रशिक्षण आयोजित करत आहोत. नावनोंदणीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर दूरभाष/whatsapp करावे. 

सस्नेह,
प्रशांत दिवेकर, ज्ञान प्रबोधिनी, पुणे.

वर्गाचे तपशील - 
दिनांक : २३ नोव्हेंबर, २०१९ – शनिवार
वेळ : स. १० ते सायं. ५
स्थळ : ज्ञान प्रबोधिनी,  ५१०, सदाशिव पेठ, पुणे.
शुल्क :   रु. २००/- प्रत्येकी
(समाविष्ट - प्रशिक्षण, अभ्यास साहित्य, चहा)
प्रशिक्षक :   प्रा. प्रशांत दिवेकर, डॉ. भाग्यश्री हर्षे, प्रा. रागिणी नाईक

पूर्वनावनोंदणी आवश्यक

संपर्क : ०२०-२४२०७२३१ / ९४२०६९६३३४

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ज्ञान प्रबोधिनी
संस्कृत संस्कृति संशोधिका 
पौरोहित्य विभाग पुणे आयोजित
  --पौरोहित्य वर्ग--
स्थळ- संस्कृत संस्कृति संशोधिका,
     पौरोहित्य विभाग,विनायक भवन,
     पहिला मजला, ज्ञान प्रबोधिनी, ५१४
सदाशिव पेठ, पुणे

प्रारंभ-        २ डिसेंबर २०१९ पासून 
कालावधी -     सुमारे सव्वा वर्षे
प्रवेश पात्रता-     सर्व जाति-धर्म -संप्रदायातील  १८ ते ६५ वयोगटातील स्त्री पुरुषांना प्रवेश
प्रशिक्षण -सोमवार ते गुरुवार 
        दररोज सायंकाळी ४ते ५
प्रवेशासाठी संपर्क-   ०२०-२४२०७१४६/४७  सकाळी- ११ ते ५ या वेळात
किंवा
santrika@jnanaprabodhini.org यावर विचारणा केल्यास वर्गाची माहिती पाठवता येईल.
                         
नोंदणीची अंतिम तारीख- २९ नोव्हेंबर २०१९
--------------------------------------------------------------------------------------------------------------
Vidyan Pradarshan

Rup Paltu Vyakhyan
Rup Paltu Vyakhyan

ज्ञान प्रबोधिनी - युवक विभाग

ज्ञान प्रबोधिनी हे गणेशोत्सवातील बरची नृत्य - वाद्य - ध्वज  पथकांचे आद्य प्रवर्तक आहे. ह्या वर्षी लवकरच सरावाला प्रारंभ करत आहोत.
पुण्याच्या ६ भागांमध्ये प्रबोधिनीच्या गटाचा रोज सराव असणार आहे. या उत्सवात आपण सर्वांनी उत्साहाने सामील व्हावे असे आम्ही आवाहन करतो.
सरावाला येण्यासाठी सोबत जोडलेला google form भरणे गरजेचे आहे. तरी लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरुन आपले नाव नोंदवावे.

https://docs.google.com/forms/d/1BOi5WzDv3Gtu4Xhd9vT-oEOgVE04I5VfZiwpgB74-7M/edit?usp=drivesdk