Upkram ane karyashala


१८ जुलै २०१८ रोजी क्षेत्र विकास लोहारा येथील 'महिला प्रशिक्षण' केंद्राचे उदघाटन झाले. त्यावेळी पोथीवाचन, यंत्र पूजन, उपासना असा १ तासाचा कार्यक्रम झाला. तिथले उमाकांत माळवदकर( अध्यक्ष) मा. लताताई, अभिजित दादा, गौरीताई अन्य सदस्य उपस्थित होते. 
तिथे महिलांना कापड़ी पिशव्या, वेगळ्या प्रकारच्या पर्स, ड्रेस व् ब्लाउज , ब्यूटी पार्लर , मेंदी इत्यादि गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचे योजले आहे.
कापड़ी पिशव्या शिवणाचे  प्रशिक्षण ठरले व नाव नोंदणी सुरू झाली, गावोगावी जाऊन प्रत्यक्ष महिलांना भेटून माहिती सांगण्यात आली. साधारण २५ महिलांची प्रशिक्षणासाठी नोंदणी  झाल्यावर तारीख पक्की केली. २० जुलै पासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. माळेगाव (६) कानेगाव (८) लोहारा (१०) अश्या ३ गावांमधून साधारणपणे पुढील १० दिवसात २४ महिलांचे प्रशिक्षण झाले. त्यातील १० महिलांची निवड करून त्यांना पिशव्या शिवणाचे काम देण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी हराळी केंद्रावरील सपनाताई पाटील येत आहेत.