Harali – Agriculture Polytechnic

  • JP  opened a training cum production workshop in Shivaganga river valley near Pune. It was the beginning of experiments in nurturing rural entrepreneurship. With 14 years of experience in rural development activities late Dr. Anna Tamhankar came to Harali, first, for rehabilitation and then for rural education and innovative agriculture. By now the various activities have gained momentum in Harali.
  • An agricultural polytechnic giving diploma in Agriculture (3years) affiliated to Marathwada Agricultural university, Parabhani

 

प्रबोधन औजारे बँक

या माझ्या भारतदेशी सुखस्वप्ने फुलुनी यावी

प्रबोधन औजारे बँक - लोकार्पण सोहळा

आपले ज्ञान प्रबोधिनीचे हराळी केंद्र हे भूकंपक्षेत्रातील गेली ३ दशक कार्यरत असलेले ग्रामीण भागातील केंद्र. प्रबोधिनीचे कार्य या भागात रूप पालटू दक्षिण मराठवाड्याचे,रूप पालटू शेतीचे या सूत्राने चालू आहे.

याभागात शेतीतील दुष्काळी भाग असल्यामुळे अनिश्चितता कायमचीच आहे. पण याही पेक्षा शेतीतील काटेकोर नियोजन, आधुनिक तंत्राचा वापर, कुशल मजूर हे प्रश्न भीषण सर्वांना अस्वस्थ करणारे आहेत.

या सगळ्यावर ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान कार्यवाह मा. सुभाषराव देशपांडे यांनी आधुनिक शेतीचालक (फार्म ऑपरेटर) संकल्पना फार पूर्वी मांडली आहे. या सगळ्या पाश्वभूमी वर आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना आणि विशेष करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक औजारे वेळेत आणि योग्य भाड्याने मिळावीत यासाठी प्रबोधन औजारे बँक आपण हराळी केंद्रामध्ये सुरू केली आहे. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामध्ये ३३ प्रकारची एकूण ५९ औजारे आणि शेतीत लागणारी साधन आपण रोटरी क्लब ऑफ लातूर मिड-टाऊन, रोटरी क्लब ऑफ अम्माऊस(अमेरिका) यांच्या अर्थसहाय्यने खरेदी केली आहेत. या सर्व प्रकल्पाचे नियोजन, सर्वेक्षण, औजारे निश्चिती, खरेदीची उत्तम ठिकाणे शोधणे आणि प्रत्यक्ष खरेदी ही सर्व पूर्वतयारी गेले ८ महिने चालू होती.

या प्रबोधन औजारे बँकेच्या माध्यमातून आपण ट्रॅक्टर मालकांना आपल्या भागात सहज उपलब्ध नसलेली औजारे, तसेच याभागात नसलेली स्वयंचलित औजारे या सोबत सहज शेतकऱ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध असलेली मनुष्यचलीत औजारे यात उपलब्ध केली आहेत. यातील आपले विशेष वेगळेपण म्हणजे या निमित्ताने आपण आपल्या कृषी तंत्र विद्यालयातील आजी-माजी आणि आजूबाजूच्या गावातील तरुणांनाचा जीवनदायी आधुनिक शेती चालक गट सुरू केला आहे. हे आपले तरुण शेतकऱ्यांची पूर्व मशागती पासून पीक काढणी पर्यंतची सर्व कामे आपल्या औजारांच्या मदतीने करून देतील. यातून तरुणांना शाश्वत रोजगार मिळेलच आणि शेतकऱ्यांना वेळेत उत्तमतेसह काम करून दिले जाईल.

या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुणे रोटरीचे प्रांतपाल स्वाती ताई हेरकळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुभाषराव देशपांडे उपस्थित होते. यासोबत आजूबाजूच्या ५ जिल्ह्यांमधून रोटरीचे सदस्य शुभेच्छा देण्यासाठी आले होते. प्रबोधिनिशी गेल्या काही वर्षांत स्नेहाने जोडलेले १०-१२ गावातील गावकरीपण उपस्थित होते.