PAUROHITYA

ज्ञान प्रबोधिनी संस्कृत संस्कृति संशोधिका (संत्रिका)

विनायक भवन, 514 सदाशिव पेठ, पुणे 38.
दूरभाष क्रमांक – 020-24207146 / 147 / 187
ई-मेल – santrika@jnanaprabodhini.org
web.-www.santrika.org ज्ञा.प्र. प्रणीत धार्मिक संस्कारांसाठी
पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग
अ )प्रस्तावना –
हिंदू समाजातील अनेकांना विविध निमित्तांनी घरात अथवा संस्थेत काही धार्मिक संस्कार करवून घेण्याची गरज वाटत असते. हे संस्कार त्यातील अर्थ समजून घेऊन व्हावेत, नवशिक्षितांना संस्कारामधील उदात्त आशय कळावा, जे लोक कर्मकांडास कंटाळले आहेत त्यांना आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण सुटसुटीत विधी  करता यावेत या हेतूंनी  ज्ञानप्रबोधिनीने ‘धर्मनिर्णय मंड़ळ, लोणावळा’ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध संस्कारांच्या (मंत्र आणि अर्थ यांनी युक्त अशा) पोथ्यांची रचना केली आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करू इच्छिणार्‍या अथवा केवळ ही पद्धत समजून घेण्याची इच्छा असणार्‍या स्त्री-पुरूषांसाठी ज्ञानप्रबोधिनीत १९९०  सालापासून पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमधून  प्रशिक्षित झालेल्या महिला आणि पुरूष-पुरोहितांचा एक संच ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने संस्कारविधी करण्याचे कार्य करीत आहे. त्या शिवाय या वर्गामधून प्रशिक्षित झालेले अनेक स्त्री-पुरूष स्वयंपुरोहित म्हणून स्वत:च्या घरातील संस्कार स्वत:च ज्ञानप्रबोधिनीच्या पोथ्यांच्या आधारे करीत आहेत.
ब) पौरोहित्य वर्गाचे उद्देश  –
१) मंत्रांचे, श्‍लोकांचे अर्थ उपस्थितांना समजावून देत विधी करणारे पुरोहित तयार व्हावेत.
२) शुद्ध आचार, विचार,उच्चार असणार्‍या सर्वांनाच पौरोहित्याचा अधिकार आहे,आणि पुरूषांप्रमाणे स्त्रियांनीसुद्धा तसेच सर्व जातींच्या व पंथांच्या व्यक्तींनीही संस्कारविधींचे पौरोहित्य करण्यास हरकत नाही हा विचार समाजात रुजावा.
३) संस्कारांच्या पद्धतीत कालोचित बदल करणे हे धर्मशास्त्रदृष्ट्या अयोग्य नाही किंबहुना आवश्यक आहे हे ज्ञान प्रबोधिनीच्या पुरोहितांच्या माध्यमातून लोकांना कळावे.
४) धार्मिक संस्कारांच्या माध्यमातून समाजात डोळस सद्भावना, ईश्‍वरनिष्ठा, ऐक्यभावना इ. सदगुणांचे बीजारोपण करणारा पुरोहितवर्ग  निर्माण व्हावा.
क)पौरोहित्य वर्गाचे स्वरूप  –
ज्ञानप्रबोधिनीच्या ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ या विभागाने आत्तापर्यंत गेल्या काही वर्षांमधे विविध पूजा, शांती,आणि संस्कारांच्या सुमारे २१ पोथ्या प्रकाशित केल्या आहेत. अनेक विधींमध्ये काही कालोचित बदल केले आहेत. या पोथ्यांच्या आधारे संस्कारविधी करणे, मंत्र आणि श्‍लोक यांचे शुद्ध उच्चारण करणे ,त्या त्या संस्कारविधींचे महत्त्व आणि त्यातील आशय लोकांना समजावून सांगणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण या  पौरोहित्यवर्गात दिले जाते. संस्कारांचे प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखविले जाते. शक्य असेल तेव्हा प्रशिक्षणार्थींकडून करवून घेतले जाते.
प्रवेश पात्रता – इ. १२ वी उत्तीर्ण; संस्कृत भाषेचा प्राथमिक परिचय असल्यास उपयुक्त, रामरक्षा अथवा अन्य संस्कृत स्तोत्र, गीताध्याय शुद्ध म्हणता येणे, गद्य वाचन शुद्ध, सुस्पष्ट आणि भाव समजून करता येणे.
ड) महत्वाची सूचना –
१) धर्मसंस्कार करण्याची ज्ञान प्रबोधिनीची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असून संस्थेच्या पोथ्यांच्या आधारेच संस्कारविधी शिकवले जातील.
२) संस्कारांचे पौरोहित्य करण्यास पात्र ठरण्यासाठी वर्गातील नियमित उपस्थिती, शुद्ध उच्चारण, पौरोहित्याच्या वेळी सांगितल्या जाणार्‍या माहितीची तयारी इ. विविध गोष्टींचा विचार केला जातो.
३) ज्ञान प्रबोधिनीचे अधिकृत पुरोहित म्हणून काम करण्यापूर्वी ज्या गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक असते त्याची माहिती वर्गामध्ये दिली जाईल.
इ) या वर्गामध्ये पुढील पोथ्यांचे प्रशिक्षण दिले जाते –
१) पूजा –                                                २) शांती –
१)  वटसावित्री पूजा                                    १)  साठी शांती
२)  श्रीसत्यनारायण पूजा                              २)  सहस्रचंद्रदर्शन शांती
३)  हरितालिका  पूजा                                  ३)  वेदपूजन उपासना (उदकशांती)
४)  श्रीगणेशस्थापना  पूजा                            ४)  वास्तुशांती
५)   दीपावलीतील लक्ष्मीपूजन ३) संस्कार –
१) नामकरण उपासना (बारसे)
२) विवाह संस्कार
३) उपनयन
४) श्राद्ध
* * *

सर्व विधी करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीच्या पुरोहितांची यादी सोबत  दिली आहे .

 1. अश्विनी आठवले – 8275205624, 8888474539
 2. मीना घाटपांडे – 9422504060
 3. उर्मिला बेटकर – 9527447580, 8605697675
 4. सुजाता बापट – 9420481491
 5. सुरेखा लिखिते – 9422332383, 02024495386
 6. सुनीती गाडगीळ – 9822333945, 02024476068
 7. चित्रा चंद्रचूड – 9823433027*
 8. चित्रा लेले – 9823686333, 02025390895
 9. माधुरी करवडे – 9850020445, 8275759673
 10. नीला खडकीकर –  9096846460, 02024309546
 11. मेधा संत – 9423579942, 02024352183
 12. मानसी  भावसार – 9325432354
 13. मीरा होळकर  – 9763826477
 14. सुनंदा जोशी – 9960224842 *
 15. अंजली राक्षे – 7507317596 *
 16. शुभदा जोशी – 9922446461, 02024579644 *
 17. मनीषा शेटे – 8806050572
 18. प्रकाश पटवे – 9423533319, 7972535813
 19. अभिजित पाठक – 9822917794, 8626058058
 20. विद्याधर मराठे – 9764259292, 02024412889
 21. विद्याधर कुलकर्णी – 9766650918
 22. प्रदीप देव – 9657278992, 02025381113
 23. प्रीती चंद्रचूड – 9823717980
 24. सुरेश तरडे – 9623953802, 02024579687
 25. हरि धारवाडकर – 9673542779, 9673542780
 26. प्रमोद उपाध्ये – 9890640234, 9890192164*
 27. सुभाष पाठक – 9850213265, 02024346532*
 28. चंदा पागे – 7507354898
 29. अरुणा जोशी – 9767376537
 30. राजेंद्र मोरे – 9850892724
  • शरद करंदीकर – 9850908546*
  • * असलेले पुरोहित वय वर्ष ७० पुढील आहेत.

डोंबिवली केंद्र

 1. सुचेता वर्तक – 9819237662
 2. शमा पुणेकर – 9594749657, 8879385424
 3. वंदना पाटील – 9833139840
 4. स्मिता अटकेकर – 9702284230
 5. सुषमा सावंत – 8108147826
 6. वैजयंती चावरे – 7045123808
 7. हर्षदा बापट – 8108769588
 8. ऋता जोगळेकर – 9819320265
 9.  स्नेहा  गोगटे – 8433533124, 9423985069
 10. संध्या कुलकर्णी – 9594326066
 11. माधुरी बेहेरे – 9619187488
 12. कल्पना गोखले – 9930082589
 13. शोभा वझे – 9167533523