Yuvak Vibhag, Pune

युवकांची संघटना कशासाठी?

चांगल्या युवक संघटना देशातील प्रबोधनाच्या कामातील अग्रदूत आहेत. त्यांना राजकीय शक्तीची केंद्रे आणि उत्पाती शक्ती मानण्याचे कारण नाही. मोठे प्रयत्न, शक्ती व त्याग यातूनच युवक संघटना घडते.प्रेरित युवकच आणखी प्रेरित युवकांचे संघ निर्माण करू शकतात.युवकांचे संघटन कार्य म्हणजे लहान वयात सुरुवात करून युवकांमध्ये देशनिष्ठा रुजवणे. तारुण्यात या निष्ठेला योग्य प्रोत्साहन देऊन पंचविसाव्या वर्षापर्यंत कार्यक्षम प्रतिभासंपन्न नेता म्हणून युवकाचे किंवा युवतीचे विकसन करणे व ऐंशिव्या वर्षापर्यंत काम करू शकतील अशी प्रेरणा त्यांच्यात निर्माण करणे.

संघटन प्रयत्नांचे माध्यम वेगवेगळे असू शकेल.कबड्डी, फुटबॉल यासारखे एक किंवा अनेक खेळ; यांत्रिकी, विद्युत्- अणुशास्त्र, जीवशास्त्र किंवा भूगर्भशास्त्राचा अभ्यास; समाजसेवा, रुग्णसेवा, नैसर्गिक आपत्तीनंतरचे मदत कार्य, अशा अनेक कृतिशील उपक्रमांच्या आधाराने युवक संघटनेने ज्या उद्दिष्टासाठी काम केले पाहिजे, ते उद्दिष्ट म्हणजे मनुष्य-निर्माण, वृत्ति-घडण व प्रेरणा-जागरण करणारे अनौपचारिक शिक्षण देणे.

देशप्रश्न सोडवण्यासाठी युवक संघटनेने दिलेल्या अनौपचारिक शिक्षणामुळे काय साध्य होईल?अनौपचारिक शिक्षण, सामाजिक दुरिताचे निर्मूलन, भौतिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला चालना, नि:स्वार्थ वृत्तीने कामाची आवड निर्माण करणे ही सर्व कामे युवक संघटना करू शकतील व देशासमोरचे प्रश्न सोडवू शकतील.

(प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पा पेंडसे यांच्या पुस्तिकेतून संकलित)

शालेय क्रीडा दले

१. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दल, सदाशिव पेठ

२. स्वातंत्र्यवीर सावरकर दल, सदाशिव पेठ

३. क्रांतीवीर चाफेकर दल, कर्वे नगर

४. उद्योगरत्न लक्ष्मणराव किर्लोस्कर दल, वारजे

५. थोरले बाजीराव पेशवे दल, नांदेड सिटी

६. गुरु गोविंद सिंह दल, वडगाव

७. शिवनगरी विस्तार दल, कोथरूड

८. छत्रपती शिवाजी महाराज दल, सहकार नगर

९. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ दल, बिबवेवाडी

१०. धर्मवीर संभाजी महाराज दल, शुक्रवार पेठ

११. आर्य चाणक्य दल, गोखले नगर

१२. सरदार वल्लभभाई पटेल दल, गोखले नगर

१३. राणा रणजितसिंह दल, गोखले नगर

 

शालेय विज्ञान दले

१४. आचार्य प्रफुल्लचंद्र राय दल, गोखले नगर

१५. डॉ. मेघनाद साहा दल, सदाशिव पेठ

१६. भारतरत्न डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन दल, सदाशिव पेठ

 

महाविद्यालयीन क्रीडा दले

१७. चंद्रशेखर आझाद दल, कोथरूड

१८. सेनासरखेल कान्होजी आंग्रे दल, वारजे

२२. नेताजी सुभाषचंद्र बोस दल, सदाशिव पेठ

२३. भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री दल, शिवाजी नगर

२४. लोकमान्य टिळक दल, सहकार नगर

 

महाविद्यालयीन विज्ञान दले

१९. डॉ. विक्रम साराभाई दल, कोथरूड

२०. भारतरत्न मोक्षगुण्डम्  विश्वेश्वरय्या दल, सहकार नगर

२१. डॉ. होमी भाभा दल, शिवाजी नगर