स्त्री शक्ती प्रबोधन

मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. !

 आजचा भाग लेखमाळेतील शेवटचा भाग ग्रामीण महिलांसाठी काम करताना सतत हे जाणवायचे की ‘कोणीतरी बाहेरून’ येऊन काम केले की कल्पना म्हणणून समजायला सोपे असते पण रुजण्याच्या दृष्टीने ते काम उपरेच रहाते! जेव्हा असे काम व्हावे असे स्थानिक महिलेला वाटते तेव्हाच ते टिकणारे होते असे आपण मागच्या भागातही पाहिले .. असेच हे मंगलचे मनोगत!       मंगल […]

मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. ! Read More »

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी !

बचत गटाच्या कामाने जेव्हा ग्रामीण स्त्री शक्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा साधारण ३५-४० वयाच्या महिला बचत गटात यायच्या. त्यांचे सरासरी शिक्षण ४थी पर्यंत झालेले असायचे .. सरासरी म्हंटले आहे म्हणजे ४थी पेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या, शाळाही न पाहिलेल्याही असायच्या. जसजसे काम सुरू झाले तेव्हा शिक्षणाचे महत्व समजायला लागले. आधी महिला विचारायच्या, ‘शिकायचे कशासाठी? शेवटी भाकरीच

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी ! Read More »

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण!

समाजात वावरायला लागणारे ज्ञान किंवा माहिती ग्रामीण महिलेला सहज उपलब्ध नसते. त्यामुळे स्वतःकडे कायमच दुय्यमत्व घेतले जाते. ‘ती’नेच स्वतःला दुय्यम ठरवले की इतरांकडूनही तशीच वागणूक मिळणे वावगे ठरत नाही. किमान माहिती कशी मिळवायची हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे लहान मोठ्ठा निर्णय करायला जो आत्मविश्वास लागतो तो नसतो. निर्णय करायच्या विषयात ‘मी या विषयात माहितगार आहे!’

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण! Read More »

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात आरोग्याचे काम करताना दूषित पाण्यामुळे होणारे आजार यावर अनेकदा चर्चा व्हायची त्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण महिलांना दिले जायचे. कारण पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेकदा बचत गटातून कर्ज घेऊन दवाखाना करावा लागायचा. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आपण टाटांनी ज्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत असे सुजल फिल्टर दिले. हा फिल्टर म्हणजे स्टीलच्या पिंपाचे झाकट कापून तिथे

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग! Read More »

मागे वळून बघताना: २६ काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात काम करायचे तर ते फक्त त्या व्यक्ती सोबत कधीच नसते, त्यांच्या कुटुंबा सोबतचे समाजासोबतचे, गावासोबतचे काम असते. शहरातली सगळीच माणसे जेवढी स्वयंपूर्ण असतात त्यामुळे एकटी असतात तेवढी गावातली नसतात. त्यामुळे ‘विकास’ कामात आलेल्या अनेक अडचणी या समाजिक बंधनामुळेही असतात. रूढार्थाने म्हणायचे तर ‘लोक काय म्हणतील?’ यामुळेही असतात. या सगळ्यांचा विचार करत आपल्या भागात

मागे वळून बघताना: २६ काही वेगळे प्रयोग! Read More »

मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते!

ग्रामीण महिलांसोबत काम करायला लागल्यावर, पहिल्यांदा कुठली गोष्ट लक्षात आली तर तिच्या आयुष्यातली एकही गोष्ट ‘ती’च्या मार्जिने झालेली नसते, लग्न तर सोडाच पण जन्म घेऊनही जणू ‘ती’ने काहीतरी चूकच केली आहे. त्यामुळे ‘ती’च्या मनासारखे होण्याची ‘ती’ची अपेक्षाही नसते. कारण संस्कार! त्याकाळात बचत गटातील महिलांची नावे पाहिली तर दगडाबाई, धोंडाबाई, नकोशी अशी एखाद-दुसरी गटात असायचीच! आता

मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते! Read More »

मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा!

ग्रामीण महिलांचा अभ्यास दौरा हा जरा वेगळाच! अभ्यास हा साधारणतः पाठ्यपुस्तकांशी संबंधीत विषय वाटतो पण दौरा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला घर सोडून गटाने बाहेर पडायचे. बाहेर पडताना ‘पर्यटन’ दृष्टीकोन ठेवायचा नाही तर काहीतरी शिकायचा अनुभवायचा असा दृष्टीकोन ठेवायचा. पहिला दौरा ‘दिल्ली राजधानी अभ्यास दौरा’ १९९८ साली झाला. त्या काळात नुकतेच महिलांना आरक्षण मिळाले होते.

मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा! Read More »

मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना!

आपल्या कामात महिलेचे भावविश्व विस्तारण्यासाठी ‘अनुभव सहलीं’चा खूप मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट शब्दामध्ये समजावून देण्यात येणाऱ्या मर्यादा, डोळ्याने पाहिले की नाहीशा होतात या अनुभवासाठी सहल हा जणू एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. वयाने मोठे झाल्यावर एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करायची तर ती गोष्ट शिकणे रंजकही असावे लागते. अनुभव सहली अशी शिक्षण संधी देतात.  ज्ञान प्रबोधिनीच्या

मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना! Read More »

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी!

स्वयंरोजगार करून किंवा बचत गटातून बाईच्या हातात पैसा का यायला पाहिजे तर जर ‘ती’ने मिळवलेला पैसा असेल तरच ‘ती’ला तो पैसा ‘ती’चा वाटतो. नाहीतर एरवी ‘ती’च्या आरोग्यासाठी केलेला खर्च ‘ती’च्यासाठी जरी गरजेचा असला तरी तिच्या कुटुंबाच्या दृष्टीने वायफळ वाटतो. ‘ती’ कमावती झाली तर स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च करणे, स्वतःकडे लक्ष देणे ‘ती’ला परवडते! भारतातल्या गावागावात ‘आशा’

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी! Read More »

मागे वळून बघताना – २१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम !

स्वयंरोजगार केल्याशिवाय बाईच्या हातात पैसे खेळते रहाणार नाहीत त्यामुळे स्वयंरोजगारासाठी गेली ३० वर्ष सातत्याने काम चालू आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षण वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या गटातील महिलांसाठी घेतले म्हणजे सहभागी महिलांचा गट जरी बदलत गेला तरी आपले काम चालू राहिले. ग्रामीण महिलेसाठी घरातील स्थान उंचावणे, घरातल्या माणसांनी तिची दाखल घेणे असे कुटुंब पातळीवर ‘ती’ कमावती झाल्यामुळे होणारे बदल

मागे वळून बघताना – २१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम ! Read More »