Sarthata Samuhikta Shistbaddhata surachitata

Samajik Adhyaan Kendra

* ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कार-पद्धतीची वैशिष्ट्ये * सार्थता –संस्काराचा अर्थ समजून घेणे सामूहिकता - उपस्थित सर्वांचा संस्कारविधीत सक्रिय सहभाग शिस्त - कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन , कार्यक्रमशांततेत पूर्ण होणे. समभाव –समाजातील सर्वांचा सहभाग. स्त्री-पुरुष दोघांनाही समान स्थान स्वयं पौरोहित्य -पोथीच्या आधारे स्वत:च स्वत:च्या घरातील विधींचे पौरोहित्य करणे. वर मांडलेली ज्ञा. प्र. ची भूमिका समजावून घेण्यासाठी जिज्ञासूंनी'संत्रिका' विभागाने प्रकाशित केलेले 'धर्मविधींच्या अंतरंगात' हे पुस्तक पाहावे.

vidyawrat 9 b 21
History

Sanskrit Sanskruti Sanshodhika – estb: 22nd July 1975 

Conducting samskaras in a disciplined, relevant form by explaining the meaning and with participation of all.
Booklets of all samskaras including naming ceremony, thread ceremony, completion of 60 years of age,

____________ - Copy
GUIDES TO CONDUCT RITUALS

 

🌺ज्ञान प्रबोधिनी,संस्कृत संस्कृति संशोधिका🌺

मराठी

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा

पौरोहित्य

ज्ञा.प्र. प्रणीत धार्मिक संस्कारांसाठी
पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग
अ )प्रस्तावना -
हिंदू समाजातील अनेकांना विविध निमित्तांनी घरात अथवा संस्थेत काही धार्मिक संस्कार करवून घेण्याची गरज वाटत असते. हे संस्कार त्यातील अर्थ समजून घेऊन व्हावेत, नवशिक्षितांना संस्कारामधील उदात्त आशय कळावा, जे लोक कर्मकांडास कंटाळले आहेत त्यांना आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण सुटसुटीत विधी  करता यावेत या हेतूंनी  ज्ञानप्रबोधिनीने ‘धर्मनिर्णय मंड़ळ, लोणावळा‘ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध संस्कारांच्या (मंत्र आणि अर्थ यांनी युक्त अशा) पोथ्यांची रचना केली आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करू इच्छिणार्‍या अथवा केवळ ही पद्धत समजून घेण्याची इच्छा असणार्‍या स्त्री-पुरूषांसाठी ज्ञानप्रबोधिनीत १९९०  सालापासून पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमधून  प्रशिक्षित झालेल्या महिला आणि पुरूष-पुरोहितांचा एक संच ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने संस्कारविधी करण्याचे कार्य करीत आहे. त्या शिवाय या वर्गामधून प्रशिक्षित झालेले अनेक स्त्री-पुरूष स्वयंपुरोहित म्हणून स्वत:च्या घरातील संस्कार स्वत:च ज्ञानप्रबोधिनीच्या पोथ्यांच्या आधारे करीत आहेत.

Research

🌺ज्ञान प्रबोधिनी,संस्कृत संस्कृति संशोधिका🌺
श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा

महालय

ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने *ऑनलाईन सामूहिक महालय श्राद्ध*
दिनांक १४ ऑक्टोबर २०२३, शनिवार या दिवशी होणार आहे.
वेळ - सकाळी १० ते १२
देणगी रक्कम- रुपये २००/- फक्त खालील लिंक वर भरावे.
पुरोहित नाव- विद्याश्री पुरंदरे निवडावे.
विधीचे नावासाठी देणगी (Donation)हा पर्याय निवडावा.
देणगी भरल्याचा स्क्रीन शॉट कृपया खालील क्रमांकावर आपल्या नावासह शेअर करावा. संत्रिका चलभाष क्रमांक- 74987 30534
१० तारखेला स्वतंत्र whatsapp गटात विधीसाठी आवश्यक साहित्याची यादी व अन्य सूचना पाठविण्यात येतील. आपल्याला काही शंका असल्यास तोपर्यंत संत्रिकेच्या चलभाष वर whatsapp करू शकता.
Zoom meeting द्वारे श्राद्धविधी सांगितला जाईल.

Library

Santrika hosts 15000 books and big Ramayana collections

Social Integration

From Prabodhini’s perspective,  including all castes and genders into Paurohitya is major step for social integration

Santrika,  511, Sadashiv Peth, Pune, Maharashtra, India. Pin - 411030 | Phone: +91-20-24207000, +91-20-24477691 | Email:santrika@jnanaprabodhini.org