सुप्त मनुष्य शक्तीचा आत्मसन्मान जागृत करणे या ज्ञान प्रबोधिनीच्या उद्दिष्टाला धरून नागरी वस्ती अभ्यास गट हे काम 2002 साली सुरू झाले. समाज संपर्क, कुटुंब भेटी देऊन त्यांचे जीवनमान समजून घेणे, विविध वस्त्यांचा अभ्यास करणे, एका वस्तीमध्ये 15 ते 20 भेटी दिल्या गेल्या. लोकांच्या अपेक्षा, अडीअडचणी समजून घेऊन काही कामांना प्रारंभ केला गेला. वस्त्यांमध्ये मुलांसाठी साप्ताहिक केंद्र, सुट्टीतील शिबिरे, अशा प्रकारे काम सुरू केले. मुलांचे वाचन क्षमता, लेखन क्षमता, अकलन अशी कौशल्य वाढविण्यासाठी “आनंदी शिक्षण प्रकल्प”ला ही सुरू केला. त्याचबरोबर “बालविकास प्रकल्प” हे मुलांच्या क्षमता विकासावर त्यांना विविध प्रकारच्या संधी मिळाव्यात अशा उद्देशानी प्रकल्प सुरू केले. कुटुंब मध्यवर्ती ठेवून कुटुंबातल्या सर्व घटकांसोबत काम असा विभागाचा एक मोठा हेतू आहे. युवतींचे शिबीर, वेगवेगळ्या प्रकारच्या सहली, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी काही मार्गदर्शन, करियर गायडन्स आणि त्याचबरोबर शिष्यवृत्ती पण द्यायला आपण सुरुवात केली. मागील १० वर्षात 100 पेक्षा जास्त तरी युवतींना आपण शिष्यवृत्ती दिलेली आहे. मुलींच्या आईचासुद्धा पाठिंबा तिच्या विकासासाठी मिळाला पाहिजे, म्हणून महिलांसाठी “सावित्री दल” सुरू केले. जे महिन्यातून एकदा गेली ७ वर्ष सुरू आहे. आरोग्य, हिमोग्लोबिन तपासणी त्याचबरोबर विविध प्रश्नांविषयी जागरूकता अनेक प्रकारच्या रोजगारांसाठी कौशल्य व विक्री प्रशिक्षण, त्यावर मार्गदर्शन करणे या सगळ्या प्रयत्नांमधून अनेक महिलांचे उद्योग सुरू झाले आहे. मग ते वाळवणाचे उद्योग असतील, खाद्यपदार्थांचे असतील किंवा अनेक प्रकारचे व्यवसायाचे काम त्या करत आहेत. तर युवकांसाठी सुद्धा “युवक प्रबोधन मेळावे” घेतले गेले. व्यक्तिमत्व विकास, स्वयंरोजगार यावर मांडणी केली गेली. तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या आड येणाऱ्या समस्या म्हणून विविध प्रकारची व्यसने, वाईट सवयी इत्यादीं वरही चर्चा घेतली गेली. गेले २२ वर्षांमध्ये ५० वस्त्यांमधील ४० हजार कुटुंबांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि मुख्यतः मुख्य प्रवाहापासून दूर असलेले विविध समाज घटकांना प्रबोधीनिशी जोडणं आणि समाजाशी जोडणं हे आपलं उद्दिष्ट यामधून साध्य झाले आहे.
मुख्य उपक्रम :-१. वस्ती भेटी : संपर्क, संवाद, समाजदर्शन, सर्व्हे : गरजा, आस्था, प्रश्नांचा अभ्यास२. सल्ला प्रशिक्षण केंद्र – वैयक्तिक व गट समुपदेशन 3. प्रेरणा जागृती कार्यक्रम किशोरी / युवती : दले, बैठका, मेळावे, प्रशिक्षण वर्ग, सहली युवक विकास : सर्व्हे, मेळावे, प्रशिक्षण महिला विकास : मासिक बैठक, वार्षिक मेळावा ४. व्यक्तिमत्व विकसनासाठी विद्याव्रत संकल्पनेवर आधारित – “चांगल्या सवयी चांगला माणूस” ५. नेतृत्व गुण विकसनासाठीचे उपक्रम६. समाज ऐक्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, एकात्मता महोत्सव ७. उद्योजकता – कला कौशल्य व व्यावसायिक प्रशिक्षण, उद्योग मार्गदर्शन ८. सेवा योजना आरोग्य, शिक्षण व अन्य मदत कार्य सर्व्हे व अभ्यासावर आधारित गरजूंना
संपर्क :- हर्षा किर्वे, विभाग प्रमुख, नागरी वस्ती अभ्यास गट,भ्रमण ध्वनी :- ९४०३८५२७७४ ; कार्यालय :०२०-२४२०७२२१
संपर्क : हर्षा किर्वे, विभाग प्रमुख, नागरी वस्ती अभ्यास गट,भ्रमण ध्वनी : ९४०३८५२७७४ ; कार्यालय : ०२० – २४२०७२२१