धर्मविधींच्या अंतरंगात

प्रस्तावना
धर्मातील अनिष्ट भाग दूर करून जीवनास उपयुक्त ठरणारा जो भाग असेल त्याची काळानुसार पुनर्मांडणी करणे म्हणजेच धर्मसंस्थापना करणे होय. या अर्थास अनुसरून ज्ञान प्रबोधिनीमध्ये धर्मसंस्कार करण्याचा प्रयत्न असतो. प्रबोधिनीच्या घटनेतही ‌‘धर्मसंस्थापना‌’ हे एक उद्दिष्ट म्हणून अंतर्भूत केलेले दिसेल. यानुसार गेल्या ३८ वर्षांत प्रबोधिनीत विविध संस्कारांच्या सुमारे २० पोथ्या तयार करण्यात आल्या. त्यांचा वापर ठिकठिकाणी सुरू झाला. अर्थ समजाऊन घेऊनच सर्व संस्कार व्हावेत यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराथी अशा विविध भाषांमधे अनुवाद केले गेले. त्यानुसार देशात अनेक प्रांतांमधे व परदेशातही या पद्धतीने संस्कार करण्यास प्रारंभ झाला.
या पद्धतीने धर्मविधी करण्यामागे स्वावलंबन प्राप्त व्हावे आणि परावलंबन कमी व्हावे अशीच प्रबोधिनीची इच्छा आहे. पण लोकांना या स्वावलंबनाचा सराव होईपर्यंत त्यांना साहाय्य करण्यासाठी पोथीनुसार संस्कार करणारे पुरोहित प्रबोधिनीमधे शिकून तयार होत आहेत. धर्मस्वावलंबन उत्पन्न होण्यास जितका काळ लागेल तोपर्यंत हा धर्ममार्गदर्शकांचा वा पुरोहितांचा वर्ग चालवावा लागेल.
सर्व समाजास प्रबोधिनीप्रणीत धर्मसंस्कारांची भूमिका स्पष्ट व्हावी यादृष्टीने ही पुस्तिका उपयुक्त ठरेल असे वाटते.
या आवृत्तीत जिज्ञासूंनी विचारलेल्या शंकांचे निरसनार्थ जी उत्तरे देण्यात आली त्याच्या आधारे काही भर ही घातली आहे.
य. शं. लेले
ज्येष्ठ मार्गदर्शक
संस्कृत संस्कृति संशोधिका

धर्म

धर्म धर्माचा अर्थ नेहमीच्या भाषेमधे आपण हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असे शब्दप्रयोग करत…

Read More

षोडश संस्कार

२. षोडश संस्कार        सम्‌‍ उपसर्ग असलेल्या ‌‘कृ‌’ या धातूपासून संस्कार हा शब्द बनला आहे….

Read More

शांती व पूजा

शांती        शांती हा शब्द ‌‘शम्‌‍‌’ धातूपासून बनलेला असून त्या धातूचा अर्थ  वाईट प्रभाव हटवणे,…

Read More

परिवर्तन का व कसे ?

       मागील तीन प्रकरणांमधे आपण धर्म म्हणजे काय, धर्मामधे स्थल-कालातीत  तत्त्वांप्रमाणेच, स्थलकालसापेक्ष सत्यासारखे तत्त्व एका…

Read More

परिशिष्ट

धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन  माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध…

Read More