ज्ञान प्रबोधिनी – मणिपुरी विद्यार्थांचा सहनिवास

मणिपुरी विद्यार्थांचा सहनिवास

ज्ञान प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रात मणिपूर येथील वनवासी व वंचित मुलांसाठी नि:शुल्क सहनिवास चालवला जात आहे. मणिपूर हे भारताच्या ईशान्य टोकाला असलेले एक सीमावर्ती राज्य. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे राज्य शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने काहीसे मागे आहे. तेथील दुर्गम वनवासी भागात हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या मुलांची शिक्षणाची उत्तम सोय व्हावी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य सुरू व्हावे म्हणून तेथील निवडक मुलांसाठी हे वसतिगृह चालवले जात आहे. ३० विद्यार्थी निवास करू शकतील असे सुसज्ज निवास कक्ष, विद्यार्थ्यांना सकस व सुग्रास आहार मिळण्यासाठी सुसज्ज भोजन कक्ष, ई-लर्निंग सुविधा, विज्ञान प्रयोग, संगणक प्रशिक्षण वर्ग, संगीत वर्ग, मैदानी खेळ यांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची योजना कार्यरत आहे.या मणिपुरी मुलांना प्रेमाने आपलेसे करण्यासाठी, उत्तम आणि राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी यथाशक्ती आर्थिक साहाय्य अवश्य करावे.

एका मुलाचा खर्च खालीलप्रमाणे – १. महिन्याचा सहनिवास खर्च – ₹ ७०००/- २. सहा महिन्यांचा सहनिवास खर्च – ₹ ४२,०००/- ३. एका वर्षाचे पालकत्व – ₹ ८४,०००/- ४. एका वर्षाचे शाळेचे शुल्क – ₹ २०,०००/- ५. प्रवास, कला, क्रीडा इ. खर्च – ₹ १६,०००/- एका विद्यार्थ्याचा एकूण वार्षिक खर्च – ₹ १,२०,०००/- दहा मुलांचा एक वेळच्या जेवणाचा खर्च – ₹ १०००/-

देणगी तपशील खालीलप्रमाणे – भारतातून देणगी देण्यासाठी Account Name – Jnana Prabodhini – Solapur Bank Name – Bank of Baroda Branch – Railway Lines, Solapur Account No. – 101401000004063 IFSC – BARB0RAISHO

परदेशातून देणगी देण्यासाठीAccount Name – Jnana Prabodhini – SolapurBank Name – State Bank of India Branch – New Delhi Main BranchAccount No. – 40456010308 (FCRA Current A/C)IFSC – SBIN0000691SWIFT – SBININBB104संपर्क :१. श्री. अनंत अल्लिशे (सहनिवास प्रमुख) – ८९९९०२९०७३२. सी.ए. श्रीरंग कुलकर्णी (व्यवस्थापक) – ९४२३५८८४०७३. वाच. अमोल गांगजी (सहकार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी सोलापूर) – ८८८८८०२६३०