लेख क्र. ४७
२१/०७/२०२५

आपण मागच्या काही लेखांमध्ये राष्ट्रवाद अभ्यास मंडळ, त्याचे बदललेले नाव व स्वरूप यांची माहिती घेतली. आजच्या लेखात संत्रिकेत होणार्या व्याख्यानमालांची थोडक्यात माहिती घेऊया. १९८७ पासून संत्रिकेत स्मृति व्याख्यानमाला सुरू झाल्या. कै. अरविंद मंगरुळकर स्मृती व्याख्यानमाला, कै. मंगलाबाई चितळे स्मृती व्याख्यानमाला (संत उपदेश-माला), कै. जानकीबाई चितळे स्मृती व्याख्यानमाला, कै. पांडुरंग आपटे स्मृती व्याख्यानमाला, कै. शांताबाई शिरोळे स्मृती व्याख्यानमाला या काही महत्वाच्या व्याख्यानमाला २०१५ पर्यंत झाल्या. त्यात अनेक विद्वान वक्ते संस्कृत, संत साहित्य, कला, इतिहास, स्थापत्य इ. विविध विषयांवर व्याख्यान द्यायला आले होते. कै. डॉ. जयश्री गुणे स्मृती पुरस्कार संस्कृत विषयात मोठे काम केलेल्या व्यक्तीला दिला जात असे, तेव्हा मान्यवरांचे व्याख्यान होत असे. याशिवाय दर महिन्याला ‘प्राच्य विद्या परिषद’ भरत असे. ही बैठक २००५ – २०१७ अशी बारा वर्षे झाली. पुरोहित बैठक सुद्धा दर महिन्याला होत आहे, त्यात कधी कधी व्याख्याने आयोजित होतात. काही विशिष्ट निमित्ताने सुद्धा व्याख्यान आयोजित होत होते जसे, विश्वकर्मा जयंती.
डॉ. ग. बा. देगलूरकर, डॉ. सुचेता भिडे-चापेकर, डॉ. हेमा क्षीरसागर, प्रा. प्रभाकर धारणे, डॉ. गणपती स्थपती, ह. भ. प. पुष्पलताबाई रानडे इ. विद्वज्जनांनी व्याख्याने देऊन संत्रिकेला समृद्ध, संपन्न केले.

कै. मंगलाबाई चितळे संत उपदेशमाला

कै. अरविंद मंगरुळकर स्मृती व्याख्यानमाला
