सुवर्ण महोत्सवानिमित्त वरिष्ठांची मनोगते

लेख क्र. ५०

२४/०७/२०२५

संत्रिकेने २२ जुलै २०२५ मंगळवार या दिवशी ५० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधिनीत केले होते. या कार्यक्रमाला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष व दूरस्थ पद्धतीने ३५० सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले. यामध्ये ज्ञान प्रबोधिनीमधील आजी व माजी सदस्य, आवर्जून निमंत्रित केलेले वेल्हा, नागरीवस्ती विभाग, जनता वसाहत व पुरोहितांनी आवर्जून निमंत्रण दिलेले यजमान/देणगीदार हे आनंदाने सहभागी झाले. मणिपुर, गुजरात, पंजाब या प्रांतांचे प्रतिनिधी परंतू कित्येक वर्षे महाराष्ट्रात स्थायिक झालेले निवडक सदस्यांच्या येण्याने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. सुरुवात मातृभूमिपूजनाने करण्यामागचा हेतू आपण सर्व एक आहोत ही भावना पोहोचवणे हा होता. पद्य, ज्येष्ठांची मनोगते, प्रास्ताविक, प्रमुख भाषण, समारोप व शेवटी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. व्यासपीठावर संचालक मा. श्री. गिरीशराव बापट, श्री. सुभाषराव देशपांडे, मा. विश्वनाथ गुर्जर, मा. वाच. अजितराव कानिटकर, वाच. मनीषा शेटे (विभागप्रमुख) होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चंदा पागे यांनी केले.

३ जून २०२५ पासून संत्रिकेचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवावा या हेतूने ४९ दिवस रोज एक लेख/ध्वनिमुद्रण ज्ञान प्रबोधिनी, संत्रिकेच्या संकेतस्थळ व दोन्हीच्या Facebook पानावर प्रसिद्ध करण्यात आले. मा. सहकार्यवाह आशुतोषदादा बारमुख, पल्लवी भाटे, संध्या कामत, मृण्मयी पंडित, मानसी जोशी-कसबेकर व पुरोहित सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे काम यशस्वी झाले. २८७ जणांच्या WhatsApp गटावर सुद्धा हे लेख/ध्वनिमुद्रण पाठवले गेले. तिथे अनेकांनी विविध विषयांबद्दल आपल्या आठवणी व प्रतिसाद नोंदवले.

आजचा पन्नासावा दिवस! यानिमित्ताने २२ जुलै २०२५ च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन या ठिकाणी पाठवीत आहोत व थोडा विराम घेत आहोत. आतापर्यंत जे पोहोचविले ते पूर्ण नाही याची कल्पना आहे. इथून पुढे दर शनिवारी भेटत राहू.

मा. श्री. यशवंतराव लेले यांचे मनोगत – https://drive.google.com/file/d/1Zq5f8rfvFJn9iJ3IjM5mh0NxxjUWAO4s/view?usp=sharing

मा. रामभाऊ डिंबळे यांचे मनोगत – https://drive.google.com/file/d/1GabRzlu7si9FYER1J8ngWPfJ4jZAzAum/view?usp=drive_link

मा. विसुभाऊ गुर्जर यांचे मनोगत –

कै. लताताई भिशीकर यांची संत्रिकेकडून असलेली अपेक्षा सांगणारी जुनी चित्रफित – https://drive.google.com/file/d/1iKlaIogUWICgPPiHry1tXih_lSoU6X2J/view?usp=drive_link

लवकरच संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण YouTube वर होणार आहे. त्याची लिंक नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवू.