६ ज्ञान प्रबोधिनीची कार्यपद्धती

हिंदुस्थानची चित्रमुर्ती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रबोधिनीच्या सोलापूरमधील वास्तूच्या उपासना मंदिरात हदुस्थानच्या चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. वीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम पुण्याच्या वास्तूत अशी प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर 1988 साली निगडीला मातृमंदिरात चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. पहिली प्रतिष्ठापना ही नवलविशेष होती. दुसऱ्यांदा झालेली प्रतिष्ठापना एका चांगल्या कल्पनेचं अनुकरण होती. तिसऱ्यांदा जणू प्रबोधिनीच्या शहरी केंद्रांकरिता एक परंपराच सुरू झाली. चांगल्या कल्पनांच्या आवृत्तीतूनच आपली वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती हळूहळू विकसित होत गेली आहे. अगदी साध्या गोष्टींपासून सुरुवात केली, तर आपल्या कार्यपद्धतीत काय काय येते ?

प्रबोधिनीच्या विविध कार्यपद्धती :

ज्ञान प्रबोधिनीची नोंदणी, संस्था नोंदणी कायद्याखाली आणि सार्वजनिक विश्वस्त कायद्याखाली केलेली आहे. कायद्याप्रमाणे प्रबोधिनीच्या सदस्य मंडळाची वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा होते. सुमारे 250 संख्येच्या सदस्यमंडळामध्ये मुख्यत: देणगीदार सदस्य व कार्यकर्ते सदस्य आहेत. सदस्यमंडळामधून सुमारे 20 जणांचे कार्यकारी मंडळ निवडले जाते. हे कार्यकारी मंडळ वर्षातून 4 ते 6 वेळेला भेटते.

ज्ञान प्रबोधिनीचे काम सहा प्रभागांमध्ये चालते. शिक्षण, ग्रामविकसन, संशोधन, प्रशिक्षण व उत्पादन, आरोग्य आणि संघटन या प्रत्येक प्रभागामध्ये (कार्यक्षेत्रामध्ये) साधारणपणे तीन ते पाच विभाग आहेत. काही विभाग सोयीसाठी शाखा – संस्था म्हणून स्वतंत्रपणे नोंदवलेले आहेत.

सहविचारात्मक पद्धती :

प्रत्येक विभागातील पाच ते आठ उत्तरदायी सदस्यांची संचालकांबरोबर साप्ताहिक/पाक्षिक बैठक असते. सर्व विभागप्रमुखांची साधारणपणे दोन महिन्यांतून एकदा बैठक होते. झालेल्या कामाचे निवेदन व सर्व विभागांची सामायिक विषयांवर चर्चा विभागप्रमुखांच्या बैठकीमध्ये होते. सर्व प्रभागांसाठी एकेका निमंत्रकाची योजना केलेली आहे. सर्व प्रभागनिमंत्रक व संचालक यांची मिळून सहविचार समिती आठवड्यातून एकदा भेटते. या सहविचार समितीत अनौपचारिकरीत्या धोरणांची चर्चा होते. कार्यकारी मंडळापुढे सविस्तर चर्चेसाठी व औपचारिक ठरावासाठी कोणते विषय ठेवायचे हे सहविचार समितीत ठरते. वर्षातून एकदा किंवा दोनदा सुारे 100 ते 125 जणांची दिवसभराची बैठक होते. यात दीर्घकालीन नियोजन व नवीन धोरणे ठरतात. अशा बैठकीध्ये प्रश्नोत्तराचे खुले सत्र असते.

संचालक भेट :

वर्षातून एकदा प्रत्येक विभागाला संचालकांची अधिकृत औपचारिक भेट समारंभपूर्वक योजली जाते. वार्षिक संचालक भेटीमध्ये विभागातील सर्व सदस्यांनी मिळून वर्षभराच्या कामाचे निवेदन करायचे असते. पुढील संकल्प मांडायचे असतात. संचालक- भेट हे जसे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे, तसेच तीन वर्षांतून एकदा होणारी निवासी प्रदीर्घ बैठक (3 ते 4 दिवस) हे देखील प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे. ही बैठक अनौपचारिक सेंलनासारखी असते; परंतु त्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते व मध्यंतर उद्दिष्टांकडे (3 ते 5 वर्षांची उद्दिष्टे) सर्वांचे लक्ष वेधले जाते.

शोध-बोध :

प्रत्येक महत्त्वाचा उपक्रम झाल्यावर होणारी शोध-बोध बैठक हे प्रबोधिनीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. नवीन सदस्यांसमवेत शोध-बोध बैठकीमध्ये मुख्यत: रसग्रहण होते. उपक्रमातील चांगल्या घटना कवा चांगले तपशील आणि त्या उपक्रमाची जबाबदारी घेतलेल्या कार्यकर्त्यांचे उपक्रमाच्या निमित्ताने लक्षात आलेले विविध गुण यांची उजळणी अशा बैठकीमध्ये होते. अधिक अनुभवी कार्यकर्त्यांच्यासमवेत शोध-बोध बैठकीत निर्णयांची चिकित्सा होते. उपक्रमाच्या हेतूपासून त्याचे वेळापत्रक, कामांची विभागणी, कार्यवाही करताना आलेल्या व्यावहारिक आणि परस्पर संवादातील अडचणी याचा शोध घेऊन पुढील कार्यक्रमांसाठी सुधारणा करायच्या गोष्टींची नोंद केली जाते. प्रबोधिनीच्या एकंदर
कामाचाही दर तीन वर्षांनी शोध-बोध घेतला जातो.

मनोगत लेखन :

मनोगतलेखन हे प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 5वी च्या विद्यार्थ्यांपासून संचालकांपर्यंत सर्वचजण मनोगत लिहितात. मनोगतलेखनामध्ये वर्षभरातील अनुभवांवरील मुक्त प्रतिक्रिया असते. त्यामध्ये आवडलेल्या घटना, न आवडलेले प्रसंग आणि न समजलेल्या कल्पना या सर्वांचीच नोंद असते. तक्रारी, शंका, सूचना आणि व्यक्तिगत योजना मांडण्याची मनोगत ही जागा असते. प्रबोधिनीच्या कामाचे समालोचन करणे आणि स्वत:चे आत्मपरीक्षण करणे यासाठी मनोगतलेखनाचा उपयोग होतो. मनोगतलेखन केल्याचा उपयोग लिहिणाऱ्याला तर होतोच. लिहिणारा व विभागप्रमुख कवा लिहिणारा आणि संचालक यांच्यात मनोगतलेखनावर चर्चा झाली, तर त्याचा आणखी उपयोग होतो. एखाद्या विभागातील सर्वांनी एकत्र बसून मनोगतांचे प्रगट वाचन करण्याइतका मोकळेपणा सर्वांध्ये आला व मनोगतातील मुद्दयांवर साधकबाधक चर्चा झाली, तर मनोगतलेखनाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो.

विकसनशील कार्यपद्धती :

प्रबोधिनीच्या कार्यपद्धीतीतील काही निवडक वैशिष्ट्यांची नोंद इथे घेतली आहे. प्रत्येक विभागाची आणि केंद्राचीदेखील अशी काही वैशिष्ट्ये आहेत. कार्यपद्धतीत सतत भर पडत असते. काही बदल कवा सुधारणा होत असतात. गेल्या तीन वर्षांत भविष्यवेधशास्त्राचा काही प्रयोग संपूर्ण प्रबोधिनीच्या स्तरावर झाला.