ही कुंदा… दुर्दैवाने एकल (विधवा) झाली! एकल म्हणून मिळणारा शासकीय लाभ मिळवताना तिला जो त्रास झाला तो इतर महिलांना होऊ नये म्हणून गरजू एकल महिलांसाठी कामाला लागली. गेल्या ७-८ वर्षात किमान १५० एकल महिलांना शासकीय लाभ मिळावा म्हणून तिने धडपड केली. तिच्या अथक प्रयत्नातून या सगळ्यांना मिळून आजपर्यंत ७५ लाख रुपये जिच्या तिच्या खात्यात शासनाकडून जमा झाले आहेत!