त्रिदशकपूर्ती यशोगाथा ११

ही शारदा… एकत्र कुटुंबातील मोठी सून, बचत गटामुळे बाहेर पडली… उलाढाली करुन चार पैसे मिळवले… खर्चून न टाकता मंगळसूत्र केलं… मुलीला सायंस शिकवून कमावती केली.. घरातला मान वाढला… गावातला मान वाढला… आता शारदाच्या रुपात गावातल्या महिलांना अडीनडीला मदतीला प्रबोधिनीची कार्यकर्ती उपलब्ध आहे!!