ही स्वाती, बचत गट प्रमुख महिलेची सून! पार्लरची शिक्षिका. भागातल्या मुली शिकाव्यात म्हणून गावोगावी जाऊन वर्ग घेते… शिकायला सुद्धा गावाबाहेर पडणं अवघड असतं… हे तिला समजतं! या प्रशिक्षणामुळे घरात / जवळच्या गावात पार्लर टाकून अनेक जणी कमावत्या झाल्या. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. स्वाती, कोर्ससाठी फेशियल शिकवत असली तरी… सकस आहारापासून stress releaseसाठी ध्यान/ मनःस्वास्धाची सत्रही घेते. त्यामुळे प्रबोधिनीच्या पार्लर प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळतो आणि शिक्षिकेला सन्मान!!