त्रिदशकपूर्ती यशोगाथा १३

सरपंच सासूची MBA सून! बचत गटातून प्रवेश झाला, घरचं सांभाळून गटाचं काम बघायला लागली… मग सगळ्याच गटांचे बँकेचे काम बघायला लागली. एरवी कर्जाची कागदपत्रे हा दडपण वाटणारा विषय सुनबाईमुळे सहज होऊन गेला. एकेका गटाला १० लाखापर्यंत बँकेचे कर्ज मिळवता आले. प्रबोधिनीच्या कामाचा वारसा घरातुनच मिळाला… मग CSR प्रकल्पांच्या व्यवस्थापनाला मदत करु लागली. कंपनीच्या चाकोरीत काम करण्यापेक्षा सामाजिक कामाचा, अनुभव आवडला. आता प्रबोधिनीची प्रतिनिधी म्हणून कंपनीत ताईंसोबत रसिकाही जायला लागली.