ही उज्ज्वला… छोट्याशा गावातली आशा सेविका… रोटरी (प्राईड) सोबत केलेल्या टेलिमेडिसिन प्रकल्पामुळे प्रबोधिनीला जोडली गेली. जेमतेम १० वी शिकलेली उज्ज्वला जेव्हा घरोघरी जाऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन म्हणजे ब्लु टूथने Tab ला जोडणी करुन रक्तातील साखर/हिमोग्लोबिन अशा तपासण्या करु लागली तेव्हा गावची डॉक्टरच झाली! तंत्रज्ञान वापरासोबत आत्मविश्वास वाढवण्यासाठीही काम केलं की प्रश्न मूळातून सोडवला पाहिजे असं वाटायला लागतं!! मग… महिलांचं हिमोग्लोबिन वाढवणे या उद्देशाचे शेवटचे टोक म्हणजे महिलांनी रक्तदान केले पाहिजे हे सहज वाटायला लागले!! आणि १२ जानेवारी २०२१ रोजी महिलांचे पहिले रक्तदान शिबिर योजले. १२.५ पेक्षा जास्त Hb असणाऱ्या ६३ जणींना जमवले पण वजन कमी असल्यामुळे १९ फक्त महिलांनी रक्तदान केले…. अशी जाणती कार्यकर्ती गावात असली की गावाच्या आरोग्याची काळजी वाटत नाही…