आस्कवडी या छोट्या गावातली श्यामल दसवडकर १० वर्षापूर्वी हिरकणी उपक्रमात आली. मुलांना वाढवताना विचार करायला लागली… स्वतः पुन्हा औपचारिक शिक्षण घ्यायला लागली आता last year ला आहे. मुलाच्या शिक्षणात रस घेतला… आपली कागदपत्र चोख हवीत त्याचं महत्त्व कळलं. मोठ्या वयात पूर्वी झालेल्या लग्नाचं marriage certificate काढणं किती अवघड गेलं ते अनुभवलं! आता गावागावात जाऊन चोख कागदपत्रांचं महत्त्व सांगण्याची जबाबदारी घेतली. नवी उमेद या प्रकल्पाचं काम बघते!