ही वैशाली गेठले! नवदिशा नेतृत्व प्रकल्पाच्या बैठकांना यायला लागली. मग तिच्या छोट्याशा गावात बचत गट सुरु केले. गावातच खात्रीचे कर्ज मिळायला लागले. व्यवहार वाढले… एकाचे दोन गट झाले. मग गटाला संस्थेच्या मदतीने बँकेचे १.५०लाख कर्ज मिळवून दिले… त्या बरोबरच कर्तेपणाचा आत्मविश्वास सुद्धा वाढला. त्यानंतर गावातील महिलांची आरोग्य तपासणी केली… कशा प्रकारच्या अडचणींना तोंड दिले ऐका. आरोग्य तपासणी नंतर काही महिलांची ऑपरेशन करायची होती. तिने दीनानाथ हॉस्पिटलमधून निःशुल्क ऑपरेशन करुन घेतली. मग मात्र गावात उठून दिसायला लागली. परिणामतः राजकीय पार्टीची तातुका पुढारी झाली!