जीवन कणाकणाने घडे…..

विद्यालय हे सगळे त्रिभुवन विद्यार्थीपण हे आजीवन
त्यास न पुस्तक शिक्षक पदवी स्वयंश्रमाने सारे शिक्षण
ग्रंथान्तरिचे ज्ञानामृत जर जगण्या अपुरे पडे
भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे
जीवन कणाकणाने घडे ।। ध्रु. ।।

निश्चित समयी घडेल निश्चित, नियत ठिकाणी वस्तु सापडत
स्थलकालाचा असा भरवसा ज्याच्यायोगे होई अवगत
वळण असे जो देइल मजला तो सद्‌गुरु सापडे
भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे ।। १ ।।

परपस्परांशी घेइल जमवुन मना गवसणी मृदमधु बोलुन
उदंड वाचन मार्मिक लेखन जना जोडण्या करि आवाहन
कौशल्यांची अशा शिकवणी अवचित पदरी पडे
भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे ।। २ ।।

मनीं कणव अन् शरीर सक्षम, सेवाभावी तसा युद्धरत
प्रतिभेचा जणु निर्झर वाहत, निधरि व्रत करी अखंडित
निर्भय हसरा लोकजयिष्णू संकटास जो भिडे
भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे ।। ३ ।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *