पाखरे भरारली निळी नभे झळाळली
पालवी नवी नवी तरूवरी थरारली
हासऱ्या सुरातूनी चालत्या पदातूनी
झेप घेऊन उसळली ही चेतना ।। ध्रु. ।।
हिचे आम्ही शुभांशु रे
सतेज रे, सुहास्य लास्य रे
युवमनी जी, संचारते, प्रकाशते
गती हिची, द्युती हिची, स्फूर्ती
क्षितिज बाहते धरेस क्षेम द्यावयास या, या ।। १ ।।