शुभ्र सुगंधित पुष्पे आणिक शुभ्र सुगंधित मने
मातृभूमि तव चरणी याहुन अन्य काय अर्पिणे ?
हे अमुचे सश्रद्ध समर्पण स्वीकारी वरदे
अमुच्या शुभव्रतांना आई, तुझे शुभाशिष दे ।। ध्रु. ।।
उपासनेला दृढ चालविणे ही अमुची साधना
दिव्यद्युतीला अवतरणास्तव करितो आवाहना
त्या तेजाने आई अमुचे अन्तर धवळू दे ।। १ ।।
केसरिया जोहार येथले इथली बलिदाने
‘सर देईन परि सार न देईन’ हे कणखर बाणे
असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे ।। २ ।।
स्नेहाचा हृबंध हवा अन् शक्ति हवी आई
सकलांची सामर्थ्य जडविल जी तुझिया पायी
तुझ्याच गौरवगानासाठी अतुल संघस्वर दे ।। ३ ।।
भविष्यवेधी स्वप्नदर्शिनी प्रतिभा आम्हा दे
रूप तुझे पालटण्यासाठी दृढतम बाहू दे
प्रेय-श्रेय ते सर्वच अंती तव पदि वाहू दे ।। ४ ।।