गाणे बचतगटाचे

मला गं बाई जाग आली । प्रबोधिनीने साथ दिली ।।
अज्ञान दूर मी मी सारीते । बचतगटाला सुरवात करिते ।। ध्रु.।।

आम्ही खेड्याच्या अडाणी बाया । कष्ट करोनी झिजती काया ।।
आया बायांना जाऊन सांगते। बचतगटाला सुरवात करिते ।।१।।

सर्व मिळोनी एकत्र येऊ। एकत्र येऊन विचार करू ।।
वीस जणींचा गट मी बनवते । बचतगटाला सुरवात करिते ।।२।।

व्याजाचा दर थोडाच ठेऊ। सावकार मारवाडी माघारी फिरवू ।।
सर्व जणींची गरज भागविते । बचतगटाला सुरवात करीते ।।३।।

शेती-भातात कष्ट करोनी। मुलां-मुलींना शिक्षण देऊनी ।।
हातचं राखुनी बचत करिते। बचतगटाला सुरवात करिते ।।४।।

बचत गटाचा हिशोब । ताईच्या हाती कागद दिला ।।
प्रबोधिनीचे आभार मानिते । बचतगटाला सुरवात करिते ।।५।।