खळखळ धावत

खळखळ धावत फेसाळत हा सागर उसळत येतो
मर्यादांना उल्लंघुनि नव आव्हाना घेतो॥ध्रु.॥

धवलगिरीच्या उंच उंच शिखरांचा बांध न ज्याला
प्रलयंकर मरुताची आहे साद जवाना तुजला॥१॥

विक्रमगाथा इतिहासाच्या पानोपानि जयांची
त्या रणवीरा नमन करोनी धाव पुढे घ्यायची॥२॥

आकर्षण गुरुतम धरतीचे सहज लीलया भेदी
विज्ञानाची गरुड भरारी तिच्यावरी तव कडी॥ ३॥

मर्यादांनी मर्यादुन? छे !! त्यांना उल्लंघुनी
पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी॥४॥