अजिंक्य करू या जगतामध्ये अपुला हिन्दुस्थान
शपथ घेऊनी सिद्ध जाहलो हाती घेऊन प्राण ॥ध्रु.॥
हिंदू म्हणुनी जन्मा आलो वेदांच्या सांगाती
सिंधूतुन अवतरली येथे पुण्यसलिल संस्कृती
अभ्युदय अन् नि:श्रेयाची जननी हीच महान! ॥१॥
गगनाहुन व्यापक हो ठरला अपुला हिंदूधर्म
हृदयाच्या गाभारी जपले ज्ञान भक्ति अन् कर्म
चित्शक्तीला नाही उरले अद्वैताचे भान॥२॥
काळाला पचवून निर्मिला तेजोमय इतिहास
सत्यासाठी रक्त सांडले जागविले धर्मास
शौर्य वीर्य अन् समृद्धीचे सुखे गायलो गान॥३॥
परंपरेला साक्षी ठेवुन स्वप्न उद्याचे मनि अवतरले
विश्वामध्ये वैभवशाली हिंदुराष्ट्र हे अजिंक्य करणे
मानवतेला घालू आम्ही अध्यात्माचे स्नान!॥४॥