पेटली ज्योत

धगधगत्या त्या मशालीवर
मीही वात पेटवून घेतली
अप्रूपाचा हुरूप होता
हुशारलो… फुशारलो|
कधी कधी आच लागून
आतल्या आत शहारलो
मशालीचा आदेश आठवून
माझा मीच सावरलो|
आदेश होता
प्रकाशाचा कैवार घेऊन
अंधाराशी वैर करा
धाऊन जा वाऱ्यासारखे
तुटून पडा ताऱ्यासारखे |
उंबऱ्याबाहेर पाऊल टाकलं
मनामध्ये आण स्मरून
अडीच विती भात्यामध्ये
एक मूठ वादळ घेऊन|
दिपून गेल्या डोळ्यांमध्ये
एक भव्य स्वप्न लेऊन
फुरफुरणाऱ्या ओठांवरती
भैरवाचे गाणे ठेवून
अन्‌‍ हातामध्ये थरथरणारी
माझी इवली ज्योत तेवून
उतणार नाही, मातणार नाही
घेतला वसा टाकणार नाही|
कधी कधी रोरावत
धावून येते बर्फवादळ
आग्नेयाचे वायव्याचे
द्वंद्व सुरू होते तुंबळ|
इवली दिवली सांभाळताना
उडते माझी तारांबळ
पण ‌‘तत्सवितु:‌’ स्मरण करता
कुठूनसे येते बळ|
पालवलेली आशा माझी
भेदू बघते सूर्यमंडळ
प्रकाशयात्रा चालू होते
समोर ध्रुव ठेवून अढळ|
तमात देखील लुकलुकणारे
काजवे कधी खुणावतात
हिरवा पिवळा उजेड दाखवीत
दिमाखात गुणगुणतात
वादळाला भीत नाही
अशी शेखी मिरवतात|
जडावलेला वेडा जीव
काजव्यांवरती लुब्ध होतो
रसरशीत तेजोगर्भ
हाती असून विसरून जातो पण
उजाडायच्या आधीच जेव्हा