हे निवेदिते माते मूर्त तू रूप ज्ञानदेचे
गुरुचरणी जे समर्पिले ते जीवन तव समिधेचे॥ध्रु.॥
धवलधारिणी तू तपस्विनी
चेतनामयी तू सौदामिनी
हाती स्मरण देतसे अंगीकृत कार्याचे॥१॥
विजयध्वजा तू वैराग्याची
धुरंधरा तू जनशक्तीची
तव प्रतिभेचा परिस लाभता सोने सकल कलांचे॥२॥
स्थिर चित्ता तू कर्मयोगिनी
नित्य व्रतस्था तू तेजस्विनी
तुझ्या तीथ अवतरले शुभ पश्चिम अन् पूर्वेचे॥३॥
भारत ज्योतींची तू दीप्ती
कालीची तू अभया मूत
चंदन ज्वाले फुले तुझ्यातुन प्रलयंकर क्रांतीचे॥४॥