शतशरदांस्तव

शतशरदांस्तव स्वीकारा ही अमुची पुष्पशती॥ध्रु.॥

प्रबोधिनीच्या सूर्यकुलाचे तुम्ही प्रिय नेते
तुमच्या आकांक्षी स्वप्नांना गगन थिटे गमते
नवल असे की वास्तव चाले या स्वप्नांमागुती॥१॥


धर्मचेतनेच्या गंगेचे अभिनव स्रोत तुम्ही
हिंदुत्वाच्या प्रबोधनाचे अग्रदूत तुम्ही
राष्ट्ररथाची तुम्ही कल्पिली नव दिशा नव गती॥२॥


तुम्ही घुमविले गायत्रीचे संघगान येथे
पृथ्वीवर पाचारण केले अनंत तेजा ते
आणि तुम्ही स्मृतिकार होउनी रचिल्या नूतन स्मृति॥३॥

अदम्य उत्कट चैतन्याचे रूप विशेष तुम्ही
प्रसन्न प्रेरक स्नेहशक्तिचे अक्षय कोष तुम्ही
स्फुरणदायिनी होवो आता तुमची उक्ती कृती॥४॥

ह्या कार्याचे कंकण धरिले आम्ही तुमच्यासवे
अंगीकारले जीवनव्रत हे आम्ही दृढभावे
तुमच्या ठायी श्रद्धा अमुची निष्ठा तुमच्या प्रती॥५॥